हार्दिक पंड्याला दगा देणाऱ्या फलंदाजाचा इंग्लंडमध्ये कहर, टीमला मिळवून दिला विजय

आयपीएल 2022 मधून माघार घेतली होती. त्याला गुजरात टायटन्सने विकत घेतल होतं. याच टीमने यंदा आयपीएलच विजेतेपद पटकावलं.

हार्दिक पंड्याला दगा देणाऱ्या फलंदाजाचा इंग्लंडमध्ये कहर, टीमला मिळवून दिला विजय
आयपीएलमध्ये हार्दिकनं दमदार कामगिरीनं अनेकांचं लक्ष वेधलंय.Image Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 3:38 PM

मुंबई: इंग्लंडमध्ये सध्या T 20 क्रिकेटचा बोलबाला आहे. तिथे टी 20 विटालिटी ब्लास्ट स्पर्धा ( T 20 vitality blast) सुरु आहे. या स्पर्धेत धावांचा पाऊस पडतोय. लॉर्ड्सवर गुरुवारी सरे आणि मिडिलसेक्समध्ये सामना झाला. या सामन्यात एका खेळाडूने जोरदार फलंदाजी केली. त्याचं नाव आहे जेसन रॉय. जेसन रॉय (Jason Roy) सरेकडून खेळला. त्याने आपल्या शानदार फलंदाजीने संघाला विजय मिळवून दिला. सरेने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट गमावून 208 धावा केल्या. मिडिलसेक्सच्या टीमला 20 षटकात आठ विकेट गमावून 188 धावांपर्यंत मजल मारता आली. टीमला विजय मिळवून देण्यात सरेचा कॅप्टन क्रिस जॉर्डनने महत्त्वाची भूमिका बजावली. क्रिस जॉर्डनने कमालीची गोलंदाजी केली. त्याने फलंदाजांना खेळपट्टिवर टिकूच दिले नाही. जेसन रॉय तोच फलंदाज आहे, ज्याने आयपीएल 2022 मधून माघार घेतली होती. त्याला गुजरात टायटन्सने विकत घेतल होतं. याच टीमने यंदा आयपीएलच विजेतेपद पटकावलं. जॉर्डन या सीजनमध्ये एमएसधोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळला. त्याला आपल्या गोलंदाजीने प्रभावी कामगिरी करता आली नव्हती.

दुसऱ्याटोकाकडून साथ मिळाली नाही

मिडिलसेक्सचा कॅप्टन स्टीफन इस्कीनाजीने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी स्वीकारली. सरेकडून जेसन रॉय सलामीला आला होता. त्याने मैदानावर पाऊल ठेवताच आक्रमक फलंदाजी सुरु केली. त्याला दुसऱ्याटोकाकडून साथ मिळाली नाही. सलामीला आलेला त्याचा जोडीदार विल जॅक्स 9 धावांवर आऊट झाला. त्यानंतर सॅम शुन्यावर आऊट झाला. पण जेसन रॉयचा झंझावात थांबला नाही. तो 17 व्या षटकापर्यंत मैदानावर होता. त्याने आपल्या डावात 45 चेंडूत 81 धावा तडकावल्या. त्याने 10 चौकार आणि तीन षटकार ठोकले. 180 च्या स्ट्राइक रेटने त्याने धावा केल्या.

कॅप्टनच स्वत: आघाडीवर राहून नेतृत्व

जेसनच्या बळावर सरेने विशाल लक्ष्य उभारलं. या धावसंख्येचा बचाव करण्याची जबाबदारी गोलंदाजांवर होती. टीमचा कॅप्टन क्रिस जॉर्डनने स्वत: आघाडीवर राहून नेतृत्व केलं. आपल्या कोट्यातील 4 षटकात 31 धावा देत त्याने 4 विकेट काढल्या.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.