भारतात आलेल्या दक्षिण आफ्रिकन टीमचं मोठं नुकसान, स्फोटक ऑलराऊंडर T20 वर्ल्ड कपमधून बाहेर

कोण आहे तो खेळाडू? भारत दौऱ्यात या खेळाडूला कधी दुखापत झाली?

भारतात आलेल्या दक्षिण आफ्रिकन टीमचं मोठं नुकसान, स्फोटक ऑलराऊंडर T20 वर्ल्ड कपमधून बाहेर
ind vs saImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Oct 07, 2022 | 1:25 PM

मुंबई: दक्षिण आफ्रिकन टीम भारत दौऱ्यावर (South Africa india tour)  आली आहे. टी 20 सीरीजनंतर आता दोन्ही टीम्समध्ये वनडे सीरीज (ODI Series) सुरु झालीय. या सीरीजनंतर दक्षिण आफ्रिकन टीम टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World cup) ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. वर्ल्ड कप सुरु होण्याआधी भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकन टीमला झटका बसला आहे. टी 20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव झालाच. पण त्यापेक्षाही मोठा धक्का ड्वेन प्रिटोरियसच्या दुखापतीने बसला आहे. प्रिटोरियस वर्ल्ड कपमधून बाहेर गेला आहे.

टीममध्ये त्याचा महत्त्वाचा रोल

काल 6 ऑक्टोबरला भारत-दक्षिण आफ्रिकेमध्ये वनडे सीरीजमधला पहिला सामना झाला. या मॅचआधी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने प्रिटोरियस दुखापतीमुळे वर्ल्ड कपमध्ये खेळणार नसल्याची माहिती दिली.

लोअर ऑर्डरमध्ये आक्रमक बॅटिंग

प्रिटोरियस मध्यमगती गोलंदाजीसह लोअर ऑर्डरमध्ये आक्रमक फटकेबाजी करतो. इंदूरमध्ये तिसऱ्या टी 20 दरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे वनडे सीरीज पाठोपाठ तो वर्ल्ड कप टीममधूनही बाहेर गेला आहे. प्रिटोरियसच्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झालं आहे. त्यामुळे तो भारताविरुद्धची वनडे मालिका आणि टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाहीय.

रिप्लेसमेंटची लवकरच घोषणा

आता प्रिटोरियसच्या जागी कोणाला संधी मिळणार? त्याची उत्सुक्ता आहे. बीसीसीआयने अजून जसप्रीत बुमराहच्या जागी कोण खेळणार? त्याची घोषणा केलेली नाही. दक्षिण आफ्रिकेने सुद्धा प्रिटोरियसच्या जागी दुसऱ्या खेळाडूच नाव जाहीर केलेलं नाही.

रिझर्व्हमध्ये कुठले खेळाडू?

दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड कप स्क्वाडमध्ये एंडिले फेहलुकवायो आणि मार्को जॅनसेन हे दोन रिझर्व्हमध्ये असलेले ऑलराऊंडर आहेत. या दोघांपैकी एकाला टीममध्ये स्थान मिळू शकतं. टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेची टीम एकाच ग्रुपमध्ये आहे. सुपर-12 राऊंडमध्ये दोन्ही टीम्स ग्रुप 2 मध्ये आहेत.

दक्षिण आफ्रीकेचा स्क्वाड

टेंबा बावुमा (कॅप्टन), क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), वेन पर्नेल, एडन मार्करम, केशव महाराज, राइली रूसो, डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, तबरेज शम्सी, एनरिक नॉर्खिया, लुंगी एनगिडी, कगिसो रबाडा, रीजा हेंड्रिक्स, हेनरिख क्लासन.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.