T20 World Cup 2024 : 9 महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, या खेळाडूचा धक्कादायक निर्णय

T20 World Cup 2024: अवघ्या 9 महिन्यातच क्रिकेटला रामराम करत टीमची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.

T20 World Cup 2024 : 9 महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, या खेळाडूचा धक्कादायक निर्णय
t20i world cup trophy 2024
Follow us
| Updated on: Jun 17, 2024 | 6:46 PM

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी आता सुपर 8 फेरीसाठी 8 संघ निश्चित झाले आहेत. बांगलादेश सुपर 8 मध्ये पोहचणारी शेवटची टीम ठरली. त्यानंतर आता साखळी फेरीतील शेवटचे काही सामने बाकी आहेत. या स्पर्धेत काही उलटफेर पाहायला मिळाले. पाकिस्तान आणि श्रीलंका यासारख्या विश्व विजेत्या संघांना सुपर 8 मध्येही पोहचता आलं नाही. तर दुसऱ्या बाजूला यजमान आणि इतर संघांच्या तुलनेत नवख्या असलेल्या यूएसएने पहिल्याच झटक्यात सुपर 8 चं तिकीट मिळवलं. या दरम्यान अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. अनेक खेळाडूंनी निवृत्तीची घोषणा केली. न्यूझीलंडचा अनुभवी ट्रेंट बोल्ट याने हा माझा शेवटचा टी 20 वर्ल्ड कप असल्याचं म्हटलं. तर 16 जून रोजी नामिबियाचा ऑलराउंडर डेव्हिड विसे याने टीम टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर झाल्याने निवृत्ती जाहीर केली. आता त्यात आणखी एका खेळाडूची भर पडली आहे. तो कोण आहे? जाणून घेऊयात.

नेदरलँड्स क्रिकेट टीम कायम उलटउेर करण्यासाठी चर्चेत असते. या स्पर्धेतही नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेसारख्या संघाला टफ फाईट दिली. नेदरलँड्सला 4 पैकी नेपाळ विरुद्धचा एकमेव सामना जिंकता आला. मात्र नेदरलँड्सला सुपर 8 मध्ये पोहचता आलं नाही. नेदरलँड्सचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं. त्यामुळे नेदरलँड्सचा फलंदाज सायब्रँड एंजेलब्रेक्ट याने निवृत्ती जाहीर केली. सायब्रँड एंजेलब्रेक्टने अवघ्या 9 महिन्यातच नेदरलँड्सची साथ सोडली. त्यामुळे एकच खळबळही उडाली आहे.

सायब्रँड एंजेलब्रेक्ट याने अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलंय. एंजेलब्रेक्ट नेदरलँड्ससाठीची कारकीर्द औटघटकेची ठरली. एंजेलब्रेक्ट फक्त 9 महिनेच नेदरलँड्सकडून खेळला. एंजेलब्रेक्ट गेल्या वनडे वर्ल्ड कप 2023 राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये 9 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध पदार्पण केलं. एंजेलब्रेक्टने नेदरलँड्सचं 12 वनडे आणि टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. एंजेलब्रेक्टने या दोन्ही फॉर्मेटमध्ये एकूण 685 धावा केल्या. तसेच 5 विकेट्सही घेतल्या.

नेदरलँड्सच्या अष्टपैलू खेळाडूचा क्रिकेटला रामराम

टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी नेदरलँड्स क्रिकेट टीम : स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन), आर्यन दत्त, बास डी लीडे, डेनियल डोरम, फ्रेड क्लासेन, कायल क्लेन, लोगान वॅन बीक, मैक्स ओ’डोड, माइकल लेविट, पॉल वॅन मीकेरेन, साइब्रांड एंगेलब्रेक्ट, तेजा निदामानुरु, टिम प्रिंगल , विक्रम सिंह आणि वेस्ले बर्रेसी.

Non Stop LIVE Update
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?.
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?.
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी.
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?.
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम.