AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup : युगांडा टीमची जर्सी पाहून आयसीसीला आलं टेन्शन! स्पर्धेपूर्वीच उचललं असं पाऊल

टी20 वर्ल्डकप स्पर्धे सुरु होण्यासाठी आता अवघ्या दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेसाठी एकूण 20 संघ कंबर कसून सज्ज झाले आहेत. असं असताना बीसीसीआयला युगांडा संघाची जर्सी पाहून टेन्शन आलं आहे. त्याला कारणंही तसंच आहे. चला जाणून घेऊयात नेमकं काय झालं ते

T20 World Cup : युगांडा टीमची जर्सी पाहून आयसीसीला आलं टेन्शन! स्पर्धेपूर्वीच उचललं असं पाऊल
Image Credit source: Twitter
| Updated on: May 29, 2024 | 1:32 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धा आयसीसी दर दोन वर्षांनी आयोजित करते. आतापर्यंत टी20 वर्ल्डकप स्पर्धेची आठ पर्व पार पडली असून यंदाचं नववं पर्व आहे. या पर्वात एकूण 20 संघ सहभागी झाले असून पाच-पाच संघांचे 4 गट आहेत. प्रत्येकी गटातून टॉप 2 संघ सुपर आठ फेरीसाठी निवडले जातील. सर्वच्या सर्व 20 संघ जाहीर झाले असून आता जेतेपदासाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. सराव सामन्यातून संघ पुढच्या तयारीला लागले आहेत. युगांडा संघाला आयसीसीने जर्सीतील डिझाईन बदलण्याची विनंती केली आहे, असं cricket.com.au वरील अहवालात म्हटले आहे. युगांडा संघ पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप स्पर्धा खेळत आहे. यासाठी संघ आणि क्रीडाप्रेमींमध्ये उत्साह आहे. यासाठी युगांडा क्रिकेट मंडळाने वर्ल्डकप जर्सीसाठी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेतून वर्ल्डकपसाठी तीन डिझाईन निवडण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय पक्षी, राखाडी मुकूट असलेल्या क्रेनपासून प्रेरित असलेली जर्सी फायनल करण्यात आली. ही जर्सी एलीजा मांगेनीच्या यांनी तयार केली आहे. मार्चमध्ये या जर्सीवर अधिकृतरित्या मोहोर उमटवण्यात आली.

युगांडाच्या जर्सीनंतर आयसीसीला खडबडून जाग आली आहे. कारण राष्ट्रीय पक्षाचे पंख खेळाडूंच्या बाहूंवर डिझाईन करण्यात आले होते. आयसीसीच्या विनंतीनंतर युगांडाने वेस्ट इंडिजला रवाना होण्यापूर्वी जर्सीत बदल केले. त्यानंतर युगांडाच्या क्रीडाप्रेमींना नेमकं काय झालं तेच कळलं नाही. अखेर युगांडा क्रिकेट असोसिएशनचे जनसंपर्क अधिकारी मुसाली डेनिस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “आयसीसीने डिझाईनमध्ये बदल करण्यास सांगितला होता. पण वेळ कमी असल्याने निवडलेल्या जर्सीच्या डिझाईनमध्ये तडजोड करण्यात आली आहे.मूळ डिझाईनमधील 20 टक्के भाग काढून टाकला असून उर्वरित डिझाईन आहे तसंच ठेवलं आहे.”

रिपोर्टनुसार, जर्सीच्या बाहुंवरील पंखामुळे प्रायोजक लोगो व्यवस्थित दिसत नव्हता. प्रायोजक लोगो अधिक चांगल्या प्रकारे हायलाइट करण्यासाठी हे पाऊल उचललं गेलं. पंख असलेला पॅटर्न काढून डिझाइनमध्ये बदल केला गेला. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत युगांडाचा पहिला सामना गयानामध्ये अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे.

युगांडाचा संपूर्ण संघ : ब्रायन मसाबाटीम (कर्णधार), सायमन सेसाजी, रोजर मुकासा, कॉस्मास क्युवुटा, दिनेश नकरानी, फ्रेड अचेलम, केनेथ वॅस्वा, अल्पेश रामजानी, फ्रँक नसुबुगा, हेन्री सेन्सियोन्डो, बिलाल हसुन, रॉबिन्सन ओबुया, रियाजत अली शाह (उपकर्णधार), जुमा मियाजी, रौनक पटेल. राखीव खेळाडू: मासूम मवेबेज, रोनाल्ड लुटाया.

महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी.
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग.