AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : विराट कोहलीच्या टी20 कारकिर्दिला शेवटच्या पर्वात ग्रहण, महत्त्वाच्या सामन्यात अशी दिली विकेट

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाला विराट कोहलीकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. आता टी20 वर्ल्डकपचं शेवटचा टप्पा सुरु आहे. सुपर 8 फेरीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतर जेतेपदासाठी फक्त दोन सामने शिल्लक राहणार आहे. असं असताना भारताला ऑस्ट्रेलियाचा कठीण पेपर सोडवाचा आहे. या महत्त्वाच्या सामन्यात विराट कोहलीने नको तेच केलं.

IND vs AUS : विराट कोहलीच्या टी20 कारकिर्दिला शेवटच्या पर्वात ग्रहण, महत्त्वाच्या सामन्यात अशी दिली विकेट
Image Credit source: BCCI
| Updated on: Jun 24, 2024 | 8:34 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीतील शेवटचा आणि महत्त्वााच सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजय दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. खासकरून ऑस्ट्रेलियाचं उपांत्य फेरीचं गणित या सामन्याच्या विजयावर अवलंबून आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या मनासारखा हा निर्णय झाला. कारण नाणेफेक जिंकली असती तर रोहित शर्माने प्रथम फलंदाजी घेतली असती. अपेक्षेप्रमाणे रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी मैदानात उतरली. पहिल्या षटकात दोन्ही खेळाडूंनी सावध भूमिका घेतली. मात्र दुसऱ्या षटकात विराट कोहली नको तेच करून बसला. आयपीएलसारखा फॉर्म त्याला टी20 वर्ल्डकप स्पर्धेत काही गवसलेला नाही. साखळी फेरीत फेल गेल्यानंतर सुपर 8 फेरीतही काही खास करू शकलेला नाही.

विराट कोहली आतापर्यंत टी20 वर्ल्डकपमध्ये 6 सामने खेळला आहे. मात्र त्याला एकूण 66 धावा करता आल्या आहेत. म्हणजेच 11 च्या सरासरीने त्याने धावा केल्या. तसेच दोन वेळा त्याला आपलं खातंही खोलता आलेलं नाही. साखळी फेरीत विराट कोहलीने आयर्लंडविरुद्ध 5 चेंडूचा सामना केला आणि फक्त 1 धाव करत बाद झाला. पाकिस्तानविरुद्ध 3 चेंडूत 4 धावा केल्या. इतकंच अमेरिकेविरुद्ध खातंही खोलता आलं नाही. पहिल्याच चेंडूवर बाद होत तंबूत परतला.

सुपर 8 फेरीत विराट कोहलीला सूर गवसताना दिसला. पण त्यातही काही खास केलं नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात 24 चेंडूत 24 धावा केल्या. यात फक्त एकच षटकार मारला. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 28 चेंडूत 37 धावा केल्या, यात 3 षटकार आणि 1 चौकार मारला. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद होत तंबूत परतला. विराट कोहलीच्या क्रिकेट कारकिर्दीतील हा शेवटचा वर्ल्डकप असल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत