AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : नाणेफेकीचा कौल जिंकताच बाबर आझमचं भारताला थेट उत्तर, म्हणाला…

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील हायव्होल्टेज सामन्यात भारत पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले आहेत. नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागल्याने भारताची धाकधूक वाढली आहे. या मैदानात मोठी धावसंख्या उभारणं तसं पाहिलं तर खूपच कठीण आहे. त्यामुळे भारताची कसोटी लागणार आहे.

IND vs PAK : नाणेफेकीचा कौल जिंकताच बाबर आझमचं भारताला थेट उत्तर, म्हणाला...
Image Credit source: Twitter
| Updated on: Jun 09, 2024 | 8:16 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वात मोठा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. या सामन्यात पाकिस्तानला विजय खूपच महत्त्वाचा आहे. दुसरीकडे भारताने हा सामना गमावला तर पुढचं गणित खूपच किचकट होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी स्थिती आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने आपला आत्मविश्वास दाखवून दिला. इतकंच काय तर अमेरिकेने पराभूत केल्यानंतरही भारत पाकिस्तान सामन्यासाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं. त्यामुळे हा सामना अतितटीचा होईल की एका बाजूने झुकलेला राहील हे लवकरच स्पष्ट होईल. बाबर आझमने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सांगितलं की, “हवामान आणि खेळपट्टीतील आर्द्रता यामुळे आम्ही प्रथम गोलंदाजी करू. परिस्थिती आम्हाला अनुकूल आहे, आमच्याकडे चार वेगवान गोलंदाज आहेत. आम्ही त्यांच्या परिस्थितीनुसार वापर करण्याचा प्रयत्न करू. भूतकाळ हा भूतकाळ आहे, आम्ही आजच्या सामन्याची वाट पाहत आहोत, आम्ही तयार आहोत आणि आमचे 100% देऊ. नेहमीच मोठा खेळ, भारत विरुद्ध पाकिस्तानचा आत्मविश्वास नेहमीच उच्च असतो. आजच्या सामन्यात आझम खानला विश्रांती घेत आहेत.”

नाणेफेक गमवल्याचं दु:ख रोहित शर्माच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसलं. आपल्या वाटेला प्रथम फलंदाजी आल्यानंतर रोहित शर्माने सांगितलं की, “आम्ही नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी केली असती.परिस्थिती पाहता मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. मागच्या खेळांमुळे आम्हाला येथील परिस्थितीचे मूल्यांकन करण्यात मदत झाली आहे. चांगली धावसंख्या मिळविण्यासाठी फलंदाजी युनिट म्हणून आम्हाला काय करावे लागेल याबद्दल चर्चा केली आहे. त्यानंतर आमच्याकडे बचावासाठी गोलंदाजी युनिट आहे. विश्वचषकात प्रत्येक खेळ महत्त्वाचा असतो, तुम्ही फक्त दाखवू शकत नाही. काहीही होऊ शकते. आम्ही त्याच प्लेइंग इलेव्हनला घेऊन खेळणार.”

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): मोहम्मद रिझवान, बाबर आझम (कर्णधार), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद अमीर.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.