PAK vs CAN : नाणेफेकीनंतर पाकिस्तानी संघ हतबल, बाबर आझमने सांगितलं की, “आमच्याकडे पर्यायच नाही”
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई आहे. पाकिस्तानने अमेरिका आणि भारताविरुद्धचा सामना गमवला आहे. त्यामुळे पुढचा प्रवास बिकट झाला आहे. असं असताना कॅनडा विरुद्धचा सामना पाकिस्तानसाठी महत्त्वाचा आहे. असं असताना पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने दु:ख बोलून दाखवलं आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात येईल अशी स्थिती आहे. त्यामुळे उर्वरित दोन सामने तर जिंकावेच लागतील. त्याचबरोबर इतर संघांच्या कामगिरीवर लक्ष ठेवावं लागेल. त्यामुळे पाकिस्तानपुढे सध्या कोणताच पर्याय नसल्याचं दिसून येत आहे. पाकिस्तान विरुद्ध कॅनडा या सामन्यात हेच दु:ख बाबर आझमने बोलून दाखवलं. नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताविरुद्ध पाकिस्तानने असाच निर्णय घेतला होता. मात्र 119 ही सोपी धावसंख्याही गाठता आली नाही. आता पाकिस्तानला कॅनडा विरुद्धच्या सामन्यात मागच्या दोन पराभवाची जखम भरून काढायची आहे. तसेच नेट रनरेटही सुधारावा लागणार आहे. नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर बाबर आझमने आपलं मन मोकळं केलं. “आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करू. ही सकाळची मॅच आहे आणि पहिल्या सहा षटकांचा आम्ही फायदा घेऊ. आम्ही संघात एक बदल केला आहे आणि सईम अयुबला स्थान दिलं आहे. आमचं पूर्ण लक्ष आजच्या सामन्यावर आहे. आम्ही सामना मोठ्या फरकाने जिंकण्याचा पर्याय करू तसेच जिंकण्याशिवाय पर्यात नाही. मी त्यांच्या काही काही गोलंदाजांविरुद्ध खेळलो आहे.”
कॅनडाचा कर्णधार साद बिन जफरने सांगितलं की, “मीही प्रथम गोलंदाजी केली असती. पण मागच्या काही सामन्यांचा निकाल आम्ही पाहिला आहे. संघांना पाठलाग करणे कठीण झाले आहे, त्यामुळे आशा आहे की आम्ही धावा बोर्डवर ठेवू शकू.त्यांना हा खेळ जिंकणे आवश्यक आहे आणि ते दबावाखाली आहेत, बोर्डवर काही धावा करून आम्ही त्यांच्यावर दबाव आणू.”
दोन्ही संघांची प्लेइंग 11
कॅनडा (प्लेइंग इलेव्हन): आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस किर्टन, श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), रविंदरपाल सिंग, साद बिन जफर (कर्णधार), डिलन हेलिगर, कलीम सना, जुनैद सिद्दीकी, जेरेमी गॉर्डन.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सैम अयुब, बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, उस्मान खान, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद अमीर.