AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Super 8, IND vs AFG : भारत आणि अफगाणिस्तानच्या या खेळाडूंवर असेल नजर, सामना कोणत्याही क्षणी फिरवण्याची ताकद

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील पहिला सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होत आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. पण भारताचं पारडं अफगाणिस्तानच्या तुलनेत जड आहे. पण अफगाणिस्तानला कमी लेखणं खरंच खूप महाग पडू शकतं. या सामन्यात या खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष असेल.

Super 8, IND vs AFG : भारत आणि अफगाणिस्तानच्या या खेळाडूंवर असेल नजर, सामना कोणत्याही क्षणी फिरवण्याची ताकद
| Updated on: Jun 19, 2024 | 5:02 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील 43 वा सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होत आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. बारबाडोसच्या ब्रिजटाऊन येथील केन्सिंगटन ओव्हल मैदानात हा सामना होणार आहे. या सामन्यात तसं पाहिलं तर भारतचा पारडं जड आहे. पण साखळी फेरीत मोठा उलटफेर करून अफगाणिस्तानने सुपर 8 फेरी गाठली आहे. त्यामुळे या सामन्यात अफगाणिस्तानला कमी लेखनं चांगलंच महागात पडू शकतं. सामन्यात उलटफेर करण्याची ताकद अफगाणिस्तानमध्ये आहेत. चांगले अनुभवी खेळाडू या संघात असून आयपीएलमध्येही नशिब आजमावलं आहे. त्यामुळे भारताची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. कॅरेबियन बेटावरील खेळपट्ट्यांचा अंदाज बांधणंही कठीण आहे. या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेणं फायद्याचं ठरेल. तसेच मोठी धावसंख्या उभारून प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकता येईल. या मैदानात आतापर्यंत 29 टी20 सामने झाले आहेत. त्यापैकी फक्त 8 सामने धावांचा पाठलाग करताना जिंकले आहेत.

या मैदानात 160 पर्यंतची धावसंख्या विजयासाठी पुरेशी असल्याचं दिसून आलं आहे. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी आहे. पण याचा अर्थ असा नाही की फलंदाज काहीच करू शकणार नाही. या दरम्यान मोठ्या फटक्याची मेजवाणी मिळू शकते. काही सामन्यात 180-190 धावसंख्याही झाली आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचे चार आणि भारताचे सात खेळाडू महत्त्वाचे ठरतील. भारताकडून ऋषभ पंत, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह हे खेळाडू महत्त्वाचे ठरतील. तर अफगाणिस्तानकडून रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम झाद्रान, अजमतुल्लाह उमरजाई आणि राशिद खान हे खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावतील.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर) , इब्राहिम झद्रान , अजमतुल्ला उमरझाई , नजीबुल्ला झद्रान , मोहम्मद नबी , करीम जनात , रशीद खान (कर्णधार) , गुलबदिन नायब , फजलहक फारुकी , नवीन-उल-हक , नूर अहमद

भारत : रोहित शर्मा (कर्णधार) , विराट कोहली , ऋषभ पंत (विकेटकीपर) , सूर्यकुमार यादव , शिवम दुबे , हार्दिक पांड्या , रवींद्र जडेजा , अक्षर पटेल , अर्शदीप सिंग , जसप्रीत बुमराह , मोहम्मद सिराज

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.