AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WI vs ENG : फिल सॉल्टची तुफानी बॅटिंग, ‘या’ चुकीमुळे सुपर-8 मध्ये वेस्ट इंडिजचा पराभव

WI vs ENG T20 World Cup Super-8 : टी 20 वर्ल्ड कप 2024 चा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये सुपर-8 राऊंडचा दुसरा सामना झाला. या मॅचमध्ये वेस्ट इंडिजला एका चूक खूप महाग पडली. महत्त्वाचे म्हणजे वर्ल्ड कपचे हे सामने वेस्ट इंडिजमध्ये होत आहेत. घरच्या मैदानात खेळताना वेस्ट इंडिजने ही चूक केली.

WI vs ENG : फिल सॉल्टची तुफानी बॅटिंग, 'या' चुकीमुळे सुपर-8 मध्ये वेस्ट इंडिजचा पराभव
wi vs engImage Credit source: AFP
| Updated on: Jun 20, 2024 | 10:49 AM
Share

T20 वर्ल्ड कप 2024 चा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. सेंट लूसिया येथे इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये सुपर-8 राऊंडचा दुसरा सामना झाला. या मॅचमध्ये इंग्लंडने वेस्ट इंडिजवर 8 विकेट राखून आरामात विजय मिळवला. वेस्ट इंडिजने पहिली बॅटिंग केली. त्यांनी इंग्लंडसमोर विजयासाठी 181 धावांच टार्गेट ठेवलं होतं. इंग्लंडने 15 चेंडू राखून आरामात विजय मिळवला. फिल सॉल्ट इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने वेस्ट इंडिजची गोलंदाजी अक्षरक्ष: कुटून काढली. 47 चेंडूत 185 च्या स्ट्राइक रेटने तुफानी 87 धावा फटकावल्या. इंग्लंडच्या या विजयात जॉनी बेयरस्टोने सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 26 चेंडूत 184 च्या स्ट्राइक रेटने नाबाद 48 धावा केल्या. सॉल्टला त्याने चांगली साथ दिली. फिल सॉल्टने त्याच्या नाबाद 87 धावांच्या खेळीत 7 फोर, 5 सिक्स मारले. जॉनी बेयरस्टोने त्याच्या नाबाद 48 धावांच्या खेळीत 5 फोर, 2 सिक्स मारले.

सेंट लूसियाची खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल होती. इंग्लंडने टॉस जिंकून पहिल क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजला बिनबाद 40 अशी चांगली सुरुवात मिळाली होती. पण ब्रँडन किंग 23 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर सांघिक प्रयत्नांच्या बळावर वेस्ट इंडिजने 180 धावांपर्यंत मजल मारली. चार्ल्स (38), पूरन (36), पॉवेल (36) आणि रुदरफोर्ड (28) यांनी योगदान दिलं.

सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा

181 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या इंग्लंडच्या ओपनर्सनी सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला. पावरप्लेमध्ये स्पिनर अकील हुसैनने त्यांना जखडून टाकलं. जॉस बटलरने 22 चेंडूत 25 धावा केल्या. पण तो संघर्ष करताना दिसला. रॉस्टन चेजच्या गोलंदाजीवर तो आऊट झाला. त्यानंतर मैदानात आलेला मोईन अली सुद्धा फार काही करु शकला नाही. 10 चेंडूत 13 धावा करुन तो पॅव्हेलियनमध्ये परतला. क्रीजवर जॉनी बेयरस्टो उतरताच वेगाने धावा सुरु झाल्या. इंग्लंडच्या टीमला एक लय सापडली. सॉल्टने सुद्धा मग आक्रमक फलंदाजी सुरु केला. दोघांच्या बॅटिंगमुळे मॅच एकतर्फी झाली. इंग्लंडने आरामात विजय मिळवला.

वेस्ट इंडिजच्या पराभवाच प्रमुख कारण काय?

वेस्ट इंडिजला टुर्नामेंटमध्ये पहिल्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. डॉट बॉल हे वेस्ट इंडिजच्या पराभवाचा एक प्रमुख कारण ठरलं. वेस्ट इंडिजने त्यांच्या इनिंगमध्ये 51 डॉट चेंडू म्हणजे जवळपास 9 ओव्हर निर्धाव खेळल्या. अखेरीस ते त्यांच्या पराभवाच एक कारण आहे.

अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.