IND vs NAM सामन्यादरम्यान कोल्ड ड्रिंक पिण्यापूर्वी जर विचार करा, कारण हा व्हिडीओ पाहून डोकं फिरेल

T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील भारताचा दुसरा सामना नामिबियाशी होत आहे. हा सामना दिल्लीच्या अरूण जेटली मैदानात होत आहे. सामना तुम्ही प्रत्यक्ष मैदानात जाऊन पाहण्यासाठी सज्ज असाल तर हा व्हिडीओ पाहा.

IND vs NAM सामन्यादरम्यान कोल्ड ड्रिंक पिण्यापूर्वी जर विचार करा, कारण हा व्हिडीओ पाहून डोकं फिरेल
IND vs NAM सामन्यादरम्यान कोल्ड ड्रिंक पिण्यापूर्वी जर विचार करा, कारण हा व्हिडीओ पाहून डोकं फिरेल
Image Credit source: Getty Images
| Updated on: Feb 12, 2026 | 4:07 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेची रंगत आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कारण साखळी फेरीचे सामने आता शेवटच्या टप्प्यात आहेत आणि सुपर 8 फेरीत जागा मिळवण्याची चुरस वाढली आहे. भारताने पहिल्या सामन्यात अमेरिकेला पराभूत केलं होतं. आता दुसऱ्या सामन्यात नामिबियाचं आव्हान असणार आहे. भारत विरुद्ध नामिबिया सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात होणार आहे. हा सामना भारताला काहीही करून जिंकणं भाग आहे. कारण पाकिस्तानविरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्यात संघावरील दडपण कमी होईल. असं असताना या सामन्यापूर्वी या स्टेडियममधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. कारणंही तसंच आहे. स्टेडियमधील फू़ड सेफ्टी आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे.

दिल्लीच्या अरूण जेटली मैदानात नेदरलँड आणि नामिबिया यांच्यात लढत झाली होती. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने पसरला आहे. या सामन्यानंतर हा व्हिडीओ चित्रित केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. पण टीव्ही 9 या व्हिडीओची पुष्टी करत नाही. व्हायरल व्हिडीओनुसार, ग्लासमध्ये शिल्लक राहिलेलं कोल्ड ड्रिंक पुन्हा एकदा बाटलीत भरलं जात आहे. त्याचा वापर पुढच्या सामन्यात केला जाऊ शकतो. आता पुढचा सामना भारत आणि नामिबिया यांच्यात होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.त्यामुळे प्रेक्षकांच्या आरोग्याशी हा खेळ असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. जर पैसे भरून असं खाणं मिळत असेल तर चिंतेचं कारण आहे.

सोशल मीडियावरील या व्हिडीओनंतर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. असं असताना दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने या प्रकरणी कोणतंही अधिकृत विधान केलेलं नाही. पण सोशल मीडियावर तर चर्चा रंगली आहे. भारत आणि नामिबिया सामना 12 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. या स्पर्धेतील हा 18वा सामना आहे. या सामन्यानंतर टीम इंडिया कोलंबोला रवाना होणार आहे. कारण 15 फेब्रुवारीला भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे.

Follow Us