IND vs PAK : ‘कोहली नव्हे धोनीला रोखा’, भारतावर विजय मिळवण्यासाठी शोएब अख्तरचा पाकिस्तानी संघाला कानमंत्र

भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या टी-20 विश्वचषकातील हाय व्होल्टेज सामन्याला अवघे काही तास बाकी आहेत. दोन्ही देशांचे चाहते या जबरदस्त सामन्यासाठी खूप एक्सायटेड आहेत.

IND vs PAK : 'कोहली नव्हे धोनीला रोखा', भारतावर विजय मिळवण्यासाठी शोएब अख्तरचा पाकिस्तानी संघाला कानमंत्र
MS Fhoni - Virat Kohli

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या टी-20 विश्वचषकातील हाय व्होल्टेज सामन्याला अवघे काही तास बाकी आहेत. दोन्ही देशांचे चाहते या जबरदस्त सामन्यासाठी खूप एक्सायटेड आहेत. चाहत्यांपासून ते दिग्गजांपर्यंत, प्रत्येकजण या सामन्यासाठी त्यांच्या संघांचा उत्साह वाढवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. दरम्यान, टीम इंडियाला पराभूत करण्यासाठी पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने आपल्या टीमला तीन महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. शोएबच्या मते, या सल्ल्यांचे पालन केल्यास पाकिस्तानचा विजय निश्चित होऊ शकतो. (T20 world cup india vs pakistan shaoib akhtar hillarous advice to pak team to win the match)

टी -20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा संघ भारतासमोर विजयासाठी संघर्ष करताना दिसला आहे. आतापर्यंत दोन्ही संघ पाच वेळा टी-20 विश्वचषक स्पर्धेत आमनेसामने आले आहेत आणि प्रत्येक वेळी टीम इंडियाला विजय मिळाला आहे. त्याचवेळी, दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या 8 टी-20 सामन्यांमध्ये पाकिस्तानने केवळ एकच सामना जिंकला आहे. रविवारी पाकिस्तान या पराभवांची मालिका संपवण्यासाठी मैदानात उतरेल.

शोएब अख्तरचा सल्ला

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने आपल्या टीमला हा सामना जिंकण्यासाठी तीन सल्ले दिले आहेत, जे पाहून तुम्हालाही हसू येईल. शोएब अख्तरने सल्ला देताना म्हटले आहे की, ‘पाकिस्तानने टीम इंडियाच्या खेळाडूंना झोपेची गोळी द्यावी, कारण ती खूप मजबूत टीम आहे. माझा दुसरा सल्ला असा आहे की, तुम्ही विराट कोहलीला इन्स्टाग्राम वापरण्यापासून थांबवा कारण तो तिथे खूप लोकप्रिय आहे. मेन्टॉर महेंद्रसिंग धोनी फलंदाजीला येणार नाही याची काळजी घ्या. धोनीला फलंदाजी करण्यापासून रोखण्याची काळजी पाकिस्तानी खेळाडूंनी घेतली पाहिजे, कारण माझ्यावर विश्वास ठेवा की, तो अजूनही सर्वात फॉर्ममध्ये असलेला फलंदाज आहे.

कधी आणि कुठे पाहता येईल हाय व्होल्टेज सामना?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी -20 विश्वचषकातील सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल, 7 वाजता नाणेफेक होईल. टीम इंडियाचा टी 20 विश्वचषक 2021 पाकिस्तान विरोधातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 2 आणि स्टार स्पोर्ट्स 3) हिंदी आणि इंग्रजी भाषेत थेट प्रसारित केले जातील. टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर तुम्हाला भारत पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेच मॅचचे अपडेटस मिळतील. तुम्ही टीव्ही 9 मराठीच्या www.tv9marathi.com या वेबसाईटला भेट देऊ शकता. या मॅचचे ऑनलाईन लाॉईव्ह स्‍ट्रीमिंग डिस्ने+ हॉटस्टारवर ऑनलाईन पाहू शकता.

कशी असेल भारताती प्लेईंग XI?

सलामीवीर : संघात सलामीची जबाबदारी रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्यावर असेल.

मधली फळी : तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आणि त्यानंतर अनुक्रमे सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांची नावे समाविष्ट केली जातील.

खालची फळी (अष्टपैलू-गोलंदाज) : रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार

इतर बातम्या

India vs Pakistan T20 world cup 2021 LIVE Score: भारत विरुद्ध पाकिस्तान आमने-सामने, महामुकाबल्याला अवघे काही तास शिल्लक

India vs Pakistan: मला यावेळी पाकिस्तानचं पारडं अधिक जड वाटतंय, ‘या’ नेत्याकडून टीम इंडियाला सावधगिरीचा इशारा

T20 World Cup 2021 Ind vs Pak : वसीम जाफरनं वात पेटवली, पाकिस्तानच्या वर्मावर बोट, भन्नाट मीम्सद्वारे डिवचलं

(T20 world cup india vs pakistan shaoib akhtar hillarous advice to pak team to win the match)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI