AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India: टीम इंडियात ‘हे’ 3 खेळाडू ठरले राजकारणाचा बळी, कोण आहेत ते?

Team India: 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार मिळवल्यानंतर पुढच्याच सामन्यात पत्ता कट. कधी आणि कुठला सामना त्यांचा शेवटचा ठरला?

Team India: टीम इंडियात 'हे' 3 खेळाडू ठरले राजकारणाचा बळी, कोण आहेत ते?
Team IndiaImage Credit source: Social Media
| Updated on: Dec 29, 2022 | 1:30 PM
Share

Indian Team: टीम इंडियात तीन कमनशिबी खेळाडू आहेत. टीमला मॅच जिंकवून दिल्यानंतरही त्यांचा फायदा झाला नाही. उलट नुकसानच झालं. हे तिन्ही क्रिकेटपटू टीम इंडियातील मोठ्या राजकारणाराचा बळी ठरलेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकल्यानंतरही पुढच्याच सामन्यात त्यांना ड्रॉप करण्यात आलं. टीम इंडियाच्या चक्रावून टाकणाऱ्या या निर्णयावर काही दिग्गजांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवल्यानंतरही या क्रिकेटर्सना का बाहेर केलं? जाणून घेऊया, कोण आहेत ते 3 खेळाडू.

1. कुलदीप यादव

चायनामन गोलंदाज कुलदीप यादव टीम इंडियातील सध्याच्या राजकारणाचा बळी ठरलाय. अलीकडेच बांग्लादेश विरुद्ध कसोटी मालिका झाली. कुलदीप यादवने पहिल्या कसोटीत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला. कुलदीपने या कसोटीत एकूण 8 विकेट घेतल्या. पहिल्या डावात 40 धावा केल्या. टीम इंडियाने बांग्लादेश विरुद्ध हा कसोटी सामना 188 धावांनी जिंकला. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवला टीम इंडियात स्थान मिळालं नाही. कुलदीपच्या जागी जयदेव उनाडकटचा समावेश करण्यात आला. क्रिकेटच्या तमाम दिग्ग्जांसह फॅन्सनी भारतीय टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं.

2. अमित मिश्रा

लेग स्पिनर अमित मिश्रा शेवटचा वनडे सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळला. 29 ऑक्टोबरला 2016 रोजी विशाखापट्टनम येथे हा सामना झाला. अमित मिश्राने त्या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने 6 ओव्हरमध्ये 18 धावा देऊन 5 विकेट काढल्या. त्याच्या गोलंदाजीचा इकॉनमी रेट 3.00 होता. अमित मिश्राला या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. पण या सामन्यानंतर अमित मिश्रा पुन्हा वनडे फॉर्मेटमध्ये खेळताना दिसला नाही. तो टीम इंडियातील अंतर्गत राजकारणाचा बळी ठरला. 3 भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार टीम इंडियाचा घातक स्विंग गोलंदाज आहे. 2018 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग कसोटीत त्याने कमालीच प्रदर्शन केलं. त्या कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. पण या मॅचनंतर त्याच टेस्ट करिअर जवळपास संपलं. भुवनेश्वर कुमारला त्या सामन्यानंतर पुन्हा कधी टेस्ट मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. भुवनेश्वर कुमारकडे दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याची क्षमता आहे. गरज पडल्यास बॅटनेही त्याने चांगली कामगिरी केली. भुवनेश्वर कुमार वर्ष 2018 मध्ये आपला शेवटचा कसोटी सामना खेळला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग कसोटीत त्याने 63 धावा केल्या व 4 विकेट्स काढले.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.