AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG | शिवम दुबे, यशस्वी इतकच विजयात त्याच गुपचूप योगदान, टीम इंडियात त्याच्यावर अन्याय होतोय का?

IND vs AFG | भारत आणि अफगाणिस्तानमध्ये तीन सामन्यांची T20 सीरीज सुरु आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. विजयानंतर फक्त शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वालची चर्चा होता. कारण दोघे स्फोटक इनिंग खेळले. पण आणखी एका खेळाडूने गुपचूप टीम इंडियाच्या विजयात मोलाच योगदान दिलं.

IND vs AFG | शिवम दुबे, यशस्वी इतकच विजयात त्याच गुपचूप योगदान, टीम इंडियात त्याच्यावर अन्याय होतोय का?
Ind vs afgImage Credit source: BCCI
| Updated on: Jan 15, 2024 | 8:28 AM
Share

IND vs AFG | टीम इंडिया सध्या अफगाणिस्तान विरुद्ध T20 सीरीज खेळत आहे. तीन सामन्यांच्या या सीरीजमध्ये टीम इंडियाने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. पहिले दोन सामने जिंकले आहेत. टीम इंडियाच्या या विजयात डावखुरा फलंदाज शिवम दुबेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दोन्ही सामन्यात दमदार इनिंग खेळताना त्याने अर्धशतक झळकवली. दोन्ही सामन्यात तो नाबाद राहिला. दुसऱ्या मॅचमध्ये यशस्वी जैस्वालने सुद्धा जबरदस्त बॅटिंग केली. या सामन्यात टीम इंडियाच्या एका खेळाडूने गपचूप आपलं योगदान दिलं. टीमच्या विजयात त्याच योगदान नाकारता येणार नाही. त्या प्लेयरच नाव अक्षर पटले आहे. रवींद्र जाडेजा नसताना अक्षरला T20 मध्ये संधी मिळते. आकड्यांवर नजर टाकली तर, अक्षर पटेलला जाडेजाच्या जागी प्राधान्य मिळालं पाहिजे.

मोहालीमधील T20 सामन्यात अक्षरने अफगाणिस्तानच्या दोन बॅट्समनना आऊट केलं. त्या मॅचमध्ये त्याने फक्त 20 धावा दिल्या. इंदूरमध्ये दुसऱ्या T20 सामन्यात चार ओव्हरमध्ये फक्त त्याने 17 धावा दिल्या दोन विकेट घेतले. फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या विकेटवर अक्षरने ही गोलंदाजी केली. अक्षरने फलंदाजांना सहज धावा करु दिल्या नाहीत व विकेटही काढल्या.

त्याचे आकडे जाडेजापेक्षा सरस

अफगाणिस्तान विरुद्धच्याच सामन्यात अक्षरने T20 क्रिकेटमधील आपले 200 विकेट पूर्ण केले. अक्षरने ही कामगिरी 234 सामन्यात केली. अक्षरने इतक्याच सामन्यात 168 इनिंगमध्ये 22.52 च्या सरासरीने 134.65 च्या स्ट्राइक रेटने 2545 धावा केल्या आहेत. जाडेजाच्या आकड्यांवर नजर टाकली, तर तो एकूण 310 T20 सामने खेळलाय. यात त्याने 216 विकेट काढलेत. मॅच आणि विकेट्स अंतर पाहिलं, तर अक्षरचे आकडे चांगले वाटतात.

जाडेजाच्या विकेट आणि धावा किती?

अक्षर याच स्पीडने चालू राहिला, तर 310 T20 सामन्यात त्याच्या नावावर जाडेजापेक्षा जास्त विकेट असतील. जाडेजाने 310 सामन्यात 25.42 च्या सरासरीने 129.33 च्या स्ट्राइक रेटने 3382 धावा केल्या आहेत. अक्षर T20 क्रिकेटमध्ये जाडेजापेक्षा जास्त प्रभावी आहे.

तर, तो त्याच्यावर अन्याय ठरेल

इतका प्रभावी खेळूनही अक्षरला जाडेजाच्या जागी प्राधान्य मिळत नाही. टीममधून बाहेर बसवल जातं. यावर्षी T20 वर्ल्ड कप होणार आहे. टीम मॅनेजमेंट जाडेजाच्या जागी अक्षरला प्राधान्य देणार का? ते कळेलच. असं झालं नाही, तर अक्षरवर अन्याय ठरेल. T20 क्रिकेटमध्ये अक्षर जाडेजापेक्षा वरचढ आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.