AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KL Rahul Wedding : केएल राहुल आथिया शेट्टी विवाहबद्ध, दोघांच्या नव्या इनिंगला सुरुवात

टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने गुपचूप लग्न उरकलं आहे. या खेळाडूने बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत सात फेरे घेतले आहेत. तसेच स्वत: क्रिकेटरने लग्नाचे फोटो ट्विट केले आहेत.

KL Rahul Wedding : केएल राहुल आथिया शेट्टी विवाहबद्ध, दोघांच्या नव्या इनिंगला सुरुवात
सुनील शेट्टीच्या लेकीचा थाटच निराळा; अथिया हिचा लेहंगा तयार करण्यासाठी लागले इतके हजार तास
| Updated on: Jan 23, 2023 | 9:36 PM
Share

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मालिका खेळवण्यात येत आहे. एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना हा मंगळवारी इंदूरमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर टी 20 सीरिजही आहे. टीम इंडिया एकाबाजूला आगामी वर्ल्ड कपचा सराव या मालिकेतून करत आहे. तर दूसऱ्या बाजूला टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने गुपचूप लग्न उरकलं आहे. सोशल मीडियावर या क्रिकेटरच्या विवाहाचे फोटो व्हायरल होत आहेत.

टीम इंडियाचा स्टार बॅट्समन केएल राहुलने लग्नबंधनात अडकला आहे. केएलने दिग्गज अभिनेता सुनील शेट्टी याची लेक अभिनेत्री आथिया शेट्टीसोबत सात फेरे घेतले आहेत. यासह केएलच्या नव्या इनिंगला सुरुवात झाली आहे. स्वत: केएलने लग्नाचे फोटो ट्विट केले आहेत.

केएल राहुल-आथिया शेट्टी विवाहबद्ध

केएल-आथियाचं लग्न मुंबईनजीकच्या खंडाळा इथे मोजक्याच जणांच्या उपस्थित पार पडलं. लग्नाला केवळ मोजकेच नातेवाईक उपस्थित होते. अगदी साध्या आणि दाक्षिणात्य पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिकेत व्यस्त आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंची लग्नाला उपस्थिती नव्हती.

केएल आणि आथियाचं लग्न साध्या पद्धतीनं पार पडलं. मात्र अनेकांना वैयक्तिक कारणांमुळे या विवाहाला उपस्थिती लावता आली नाही. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार आयपीएलनंतर ग्रँड रिस्पेशनचं आयोजन करण्यात येणार आहे. या रिस्पेशनला विविध क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. एकूण 3 हजार जणांची उपस्थिती असेल, असं म्हटलं जात आहे.

आथिया-केएलची लव्हस्टोरी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल-आथियाची ओळख एका कॉमन फ्रेंडद्वारे झाली होती. तेव्हा मात्र याबाबत कुणालाही केएल-आथियाच्या गॅटमॅटबाबत कुणालाच माहिती नव्हती. मात्र यानंतर आथिया आणि केएलने सोशल मीडियावर एकमेकांना वाढदिवशी शुभेच्छा दिल्या. तेव्हापासून या दोघांमध्ये काहीतरी सुरु असल्याची चर्चा सुरु झाली.

यानंतर टीम इंडिया 2021 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेली होती. या दौऱ्यात केएलचा कसोटी मालिकेत समावेश करण्यात आला होता. तेव्हा आथियाही केएलसोबत गेली होती. दोघांनी रिलेशनशीपबाबत उघडपणे काहीच सांगितलं नाही. मात्र सोशल मीडियावर दोघांचे फोटो व्हायरल झाले. हे फोटो त्यांच्यात सुरु असलेल्या प्रेमाला लपवू शकले नाहीत.

शेवटी तो दिवल उजाडलाच. ज्याची सर्वांना प्रतिक्षा होती, त्याची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली. आथियाने 2021 मध्ये वाढदिवशी केएलसोबत रिलेशनमध्ये असल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघं आणखी जवळ आले. अखेर केएल बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्याचा जावई झाला. तर आथिया क्रिकेटरची बायको झाली.

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.