AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India | नशिबात आली फक्त एक टेस्ट मॅच, टीम इंडियात संधी मिळत नसल्याने उद्धवस्त होतेय एक खेळाडूच करियर

Indian Cricket : भारतीय क्रिकेटमधील एक स्टार वेगवान गोलंदाज दीर्घ काळापासून टीम इंडियात संधी मिळण्याती प्रतिक्षा करतोय. या खेळाडूला टीम इंडियासाठी फक्त 1 टेस्ट खेळण्याची संधी मिळालीय.

Team India | नशिबात आली फक्त एक टेस्ट मॅच, टीम इंडियात संधी मिळत नसल्याने उद्धवस्त होतेय एक खेळाडूच करियर
Team india
| Updated on: Jun 18, 2023 | 1:24 PM
Share

मुंबई : टीम इंडिय़ाने वर्ष 2021 मध्ये गाबा कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक सीरीज जिंकली होती. या मॅचमध्ये टीम इंडियाकडून एका खेळाडूला डेब्यु करण्याची संधी मिळाली होती. ही टेस्ट मॅच या खेळाडूच्या करियरची पहिली आणि शेवटची टेस्ट मॅच ठरली. या मॅचनंतर हा खेळाडू भारतीय टेस्ट टीममध्ये पुन्हा पुनरागमन करु शकला नाही. महत्वाच म्हणजे गाबा कसोटीत या खेळाडूच प्रदर्शन जबरदस्त होतं.

क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियातच या खेळाडूने डेब्यु केला होता. पण आता हा प्लेयर टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करतोय.

दूर-दूर पर्यंत टीम इंडियाच्या प्लानमध्ये नाही

या गोलंदाजच नाव आहे टी.नटराजन. त्याने वर्ष 2020 मध्ये आपल्या करीयरची सुरुवात केली. पण आता हा गोलंदाज बाहेर आहे. टी. नटराजन दूर-दूर पर्यंत टीम इंडियाच्या प्लानमध्ये दिसत नाहीय.

पुन्हा कसोटी संघात दिसला नाही

वर्ष 2020-21 मध्ये जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गाबाच्या मैदानात टेस्ट सीरीजमधला शेवटचा सामना खेळला गेला. या मॅचमधून टी नटराजनने डेब्यु केला. पहिल्या इनिंगमध्ये टी. नटराजनने 24.2 ओव्हर्स बॉलिंग केली. 3 विकेट घेतले. ही मॅच टीम इंडियाने 3 विकेटने जिंकली होती. पण या मॅचनंतर टी नटराजन भारतीय कसोटी संघात स्थान मिळवू शकला नाही. यॉर्कर मॅन म्हणून ओळख

नटराजनने करियरच्या सुरुवातीला यॉर्कर मॅन म्हणून ओळख बनवली होती. नटराजनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तिन्ही फॉर्मेटमध्ये आपला पहिला सामना खेळला. टी नटराजन मार्च 2021मध्ये इंग्लंड विरुद्ध आपला शेवटचा सामना खेळला. नटराजन टीम इंडियासाठी 1 टेस्ट. 4 T20 आणि 2 वनडे इंटरनॅशनल खेळलाय. टी नटराजनने टेस्टमध्ये 3 विकेट, टी 20 इंटरनॅशनलमध्ये 7 विकेट आणि वनडे इंटरनॅशनलमध्ये 3 विकेट काढल्या आहेत.

Follow Us
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान चर्चेत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत, म्हणाले 'तुम्ही म्हणाले ते मान्य मात्र...
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत...
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंची फटकेबाजी
अमित शाहांच्या आगमनाची जय्यात तयारी तर पहा! व्हिडीओ आला समोर
Amit shah Pune Visit | अमित शाहांच्या आगमनाची जय्यात तयारी तर पहा! व्हिडीओ आला समोर
LIVE मेळाव्यात घडलं अनपेक्षित! अमित ठाकरे भरसभेत बोलताना भाषणच विसरले
LIVE मेळाव्यात घडलं अनपेक्षित! अमित ठाकरे भरसभेत बोलताना भाषणच विसरले... Video होतोय व्हायरल
UPSC चा पेपर फुटत नाही, मग NEET चाच का? सुळेंचा सरकारला थेट सवाल
UPSC चा पेपर फुटत नाही, मग NEET चाच का? सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल
एकतर गृहमंत्र्यांसारखे या, नाही तर गुंड्यांसारखे या' - Sanjay Raut
Sanjay raut UNCUT | एकतर गृहमंत्र्यांसारखे या, नाही तर गुंड्यांसारखे या, तुम्ही...' संजय राऊतांचं अमित शाहांबाबत खळबळजनक विधान
गिरीश महाजन - विजय चौधरी कथित ऑडिओ प्रकरणाला धक्कादायक वळण! PA ने...
गिरीश महाजन - विजय चौधरी कथित ऑडिओ प्रकरणाला धक्कादायक वळण! स्वीय सहाय्यकानेच... भाजपमध्ये मोठ्या घडामोडी
कॉमनवेल्थमध्ये भारताची पदकांची आतषबाजी! एका दिवसात 6 पदके
Commonwealth Game | कॉमनवेल्थमध्ये भारताची पदकांची आतषबाजी! एका दिवसात 6 पदके, ज्युडोपासून भालाफेकीपर्यंत भारतीय खेळाडूंची कमाल
FDA चा 98% स्वच्छ अहवाल हायकोर्टाने फेटाळला
Special Report | Tukaram Mundhe | FDA | मंत्रालयाच्या कँटीनचा भांडाफोड! FDA चा 98% स्वच्छ अहवाल हायकोर्टाने फेटाळला
पंतप्रधान मोदींच्या आणखी एका व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान मोदींच्या आणखी एका व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ! त्या कृतीने वेधलं लक्ष