IND Vs AUS 1st Test | ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा संघ जाहीर, राहुलला डावलल्याने आश्चर्य

India vs Australia 1st test | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 डिसेंबरपासून 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे.

IND Vs AUS 1st Test | ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा संघ जाहीर, राहुलला डावलल्याने आश्चर्य
Follow us
| Updated on: Dec 16, 2020 | 6:46 PM

अॅडिलेड : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India Tour Australia 2020-21) यांच्यात गुरुवारपासून (17 डिसेंबर) कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. हा कसोटी सामना डे-नाईट असून पिंक (गुलाबी) चेंडूने खेळण्यात येणार आहे. या पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाच्या अंतिम 11 खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. Team India final 11 players announced for first Test against Australia in Adelaide

महत्त्वाचं म्हणजे या कसोटीसाठी मुंबईकर पृथ्वी शॉची (Prithvi Shaw) निवड करण्यात आली आहे, तर के एल राहुलला (K L Rahul) बाहेर ठेवल्याने आश्चर्य व्यक होत आहे.

केएल-गिलला संधी नाही

पहिल्या या कसोटी सामन्यात केएल राहुलला (KL Rahul) आणि शुभमन गिलला (Shubman Gill) संधी देण्यात आली नाही. या दोघांना संधी न दिल्याने या दोघांच्या चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीची मदार उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर असणार आहे. तर फिरकी गोलंदाजीची जबाबदारी अनुभवी आर आश्विनकडे असणार आहे.

ऋद्धीमान साहाला विकेटकीपर म्हणून संधी

ऋद्धीमान साहा याला पहिल्या कसोटी सामन्यात विकेटकीपर म्हणून संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया ए विरोधातील सराव सामन्यात या दोघांनी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे या दोघांकडून विकेटकीपर म्हणून दावेदारी सिद्ध करण्यात आली होती. मात्र टीम मॅनेजमेंटने पंतऐवजी ऋद्धीमान साहावर विश्वास दाखवला आहे.

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया : मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), आर. अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी, आणि जसप्रीत बुमराह

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड

दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड

तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी

चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या :

IND Vs AUS : कर्णधार विराट कोहलीला विश्वविक्रमाची संधी

PHOTO | ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामन्यात विजय मिळवून देणारे टीम इंडियाचे स्टार खेळाडू

Ind Vs Aus : अजिंक्य स्वत:ला कर्णधार म्हणून सिद्ध करेल, मराठमोळ्या रहाणेवर विराटला विश्वास

Ind vs Aus: ‘या’ दोन खेळाडूंमुळे कर्णधार विराट कोहलीच्या अडचणीत वाढ

Team India final 11 players announced for first Test against Australia in Adelaide

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.