Marathi News Photo gallery Ind vs aus these indian players have been the real heroes of the test win in australia
PHOTO | ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामन्यात विजय मिळवून देणारे टीम इंडियाचे स्टार खेळाडू
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात एकूण 48 कसोटी सामने खेळले आहेत. या 48 सामन्यांपैकी टीम इंडियाने 7 सामन्यात कांगारुंना पराभूत केलं आहे.
sanjay patil |
Updated on: Dec 16, 2020 | 12:03 PM
Share
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्यापासून (17 डिसेंबर) कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियात आतापर्यंत 48 कसोटी सामने खेळले आहेत. टीम इंडियाचा या 48 सामन्यांपैकी 29 सामन्यात पराभव झाला आहे. तर 12 सामने अनिर्णित सुटले आहेत. तर केवळ 7 सामन्यातच विजय मिळवता आला आहे.
1 / 5
टीम इंडिया 1980-81 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होती. यावेळेस 3 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. टीम इंडियाने या मालिकेतील शेवटचा सामना 59 धावांनी जिंकला होता. या सामन्यात गुंडप्पा विश्वनाथ टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले होते. गुंडप्पा विश्वनाथ यांनी शतकी खेळी केली होती.
2 / 5
2003 मध्ये टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडिलेड येथे दुसरा कसोटी सामना खेळण्यात आला. या सामन्यात द वॉल अर्थात राहुल द्रविडने पहिल्या डावात 233 तर दुसऱ्या डावात नाबाद 72 धावा केल्या. या जोरावर टीम इंडियाचा विजय झाला. द्रविड टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला.
3 / 5
टीम इंडियाने 2018-19 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाविरोधात 2-1 च्या फरकाने कसोटी मालिका जिंकली. चेतेश्वर पुजारा या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याचा हिरो ठरला.
4 / 5
याच दौऱ्यातील तिसरा सामनाही टीम इंडियाने जिंकला. यासह टीम इंडियाने मालिकाही जिंकली. या तिसऱ्या सामन्यात बुमराहने धमाकेदार कामगिरी केली. बुमराहच्या गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने हा सामना जिंकला. बुमराह तिसऱ्या कसोटी सामन्याचा हिरो ठरला.