AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Big News : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी, गौतम गंभीरनंतर झहीर खानवर मोठी जबाबदारी, जाणून घ्या

Zaheer Khan latets News : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आलीये. टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाजा झहीर खान याच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

Big News : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी, गौतम गंभीरनंतर झहीर खानवर मोठी जबाबदारी, जाणून घ्या
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 28, 2024 | 4:15 PM
Share

टीम इंडियाच्या मुख्य कोचपदी गौतम गंभीर याची नियुक्ती करण्यात आली आहे. गौतम गंभीर लखनऊ सुपर जायंट्स संघाचा मेंटॉर म्हणून काम पाहत होता. त्यानंतर गंभीरने केकेआरमध्ये मेंटॉरची जबाबदारी पार पाडली. केकेआरने विजेतेपद जिंकल्यावर गौतम गंभीर याची टीम इंडियाच्या कोचपदी नियुक्ती झाली होती. यंदा आयपीएलचा मेगा लिलाव होणार असून त्याआधी टीम इंडियाचा माजी गोलंदाज झहीर खान याच्यावर मोठी जबाबदारी दिली गेली आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या मेंटॉरपदी झहीर खान याची निवड झाली आहे. लखनऊ सुपर जायंट्सने याबाबत सोशल मीडियावर व्हिहडीओ पोस्ट करत माहिती दिली आहे.

लखनऊ सुपर जायंट्स फ्रँचायझीमध्ये गौतम गंभीर सुरूवातीचे दोन वर्षे मेंटॉर म्हणून जबाबदारी पार पाडत होता. पहिल्या दोन्ही वर्षी लखनऊ संघ आयीपएलमध्ये प्ले-ऑफसाठी पात्र ठरली होती. मात्र 2024 मध्ये गंभीरने केकेआरकडे गेला. केकेआरमध्ये गेल्यावर त्याच वर्षी केकेआरने आयपीएलचे तिसऱ्यांदा विजेतेपद उंचावले होते. लखनऊने IPL 2025 आधी मेंटॉर घेण्याचा निर्णय घेतला. आता झहीर खान लखनऊमध्ये मेंटॉर असणार आहे. झहीर खान याने आयपीएलमध्ये स्वत: 100 सामने खेळले आहेत.

लखनऊ सुपर जायंट्स संघाच कोचिंग स्टाफ पाहिला जस्टिन लँगर हे मुख्य कोच आहेत. लान्स क्लुसनर आणि ॲडम व्होजेस हे सहाय्यक प्रशिक्षक आहेत. आता या स्टाफमध्ये झहीर खान याचा समावेश होणार आहे. कोचिंग स्टाफमध्ये कोणताही बदल होणार नाही.

दरम्यान,  2011 ला टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी टीम इंडियाकडून झहीर खान याने सर्वाधिक विकेट घेत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. झहीर खान याने टीम इंडियासाठी 92 कसोटींमध्ये 311 विकेट, तर वनडे क्रिकेटमध्ये 200 सामन्यांमध्ये 282 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्येही झहीरने 102 विकेट मिळवल्या आहेत.आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!