AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट आणि गंभीर यांचा वाद सुरु असताना टीम इंडियाला टी 20 मध्ये फायदा, आयसीसीने थेट जाहीरच केलं की…

आयपीएल 2023 स्पर्धा रंगतदार वळणावर असताना टीम इंडियाला चांगली बातमी मिळाली आहे. टेस्टनंतर आता टी 20 मानाचा तुरा खोवला गेला आहे. नेमकं काय झालं वाचा

विराट आणि गंभीर यांचा वाद सुरु असताना टीम इंडियाला टी 20 मध्ये फायदा, आयसीसीने थेट जाहीरच केलं की...
विराट आणि गंभीर वाद सुरु असताना आयसीसीने दिली गुड न्यूज, काय ते वाचाImage Credit source: ICC
| Updated on: May 02, 2023 | 4:33 PM
Share

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या भांडणाची चर्चा सुरु असताना आयसीसीकडून एक चांगली बातमी समोर आली आहे. आयसीसीने टी 20 स्पर्धेतील क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय संघाचं अव्वल स्थान कायम आहे. भारताची टी 20 वर्ल्डकप 2021 मध्ये कामगिरी चांगली नव्हती. पण 2022 टी 20 वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली होती. दुसरीकडे, मे 2020 नंतर श्रीलंकेविरुद्ध 2021 मध्ये मालिका गमावली होती. त्यानंतर सलग 13 टी 20 मालिका जिंकल्या तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2022 मध्ये एक मालिका बरोबरीत सुटली.

आयसीसी टी 20 क्रमवारीतील टॉप 5 संघ

आयसीसी टी 20 क्रमवारीत भारताचे 267 गुण आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडचे 259 गुण, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडचे 256 गुण, चौथ्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानचे 254 गुण, तर पाचव्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेचे 253 गुण आहेत.

कसोटी संघातही पटकावलं अव्वल स्थान

कसोटी क्रमवारीतही भारतीय संघाने अव्वल स्थान पटकावलं आहे. टिम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी धोबीपछाड देत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. आयसीसीने नुकतीच क्रमवारी जाहीर केली आहे.

भारतीय संघ कसोटी क्रमवारीत 121 रेटिंग पॉइंट्ससह पहिल्या स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलियाची 116 पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानी, इंग्लंड 114 गुणांसह तिसऱ्या स्थानी, दक्षिण आफ्रिका चौथ्या आणि न्यूझीलंड पाचव्या स्थानी आहे. पाकिस्तान सहाव्या, श्रीलंका सातव्या, विंडिज आठव्या बांगलादेश नवव्या आणि झिंबाब्वे दहाव्या स्थानी आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान आहे. त्यामुळे जेतेपद पटकावून अव्वल स्थान कायम ठेवण्याचं आव्हान टिम इंडियासमोर आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

WTC Final साठी टीम इंडिया| रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया | पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.