टीम इंडियाचं मैदानात ‘ऑपरेशन सिंदूर’, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विजयानंतर व्यक्त केल्या अशा भावना

आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. भारताने पाकिस्तानवर 5 गडी राखून शेवटच्या षटकात विजय मिळवला. या विजयासह भारताने नवव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलं आहे.

टीम इंडियाचं मैदानात ऑपरेशन सिंदूर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विजयानंतर व्यक्त केल्या अशा भावना
टीम इंडियाचं मैदानात 'ऑपरेशन सिंदूर', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विजयानंतर व्यक्त केल्या अशा भावना
Image Credit source: TV9 Network/Hindi
| Updated on: Sep 29, 2025 | 1:19 AM

पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. तसेच पाकिस्तानच्या ठेचलं होतं. त्यामुळे पाकिस्तान जगापुढे बचावासाठी भिकेचा वाडगा घेऊन फिरत होता. असं असताना 26 निष्पाप बळी गेल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे होते नव्हते ते सर्व संबंध तोडले. पण क्रिकेटच्या मैदानात बहुसंघीय स्पर्धेत खेळण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे भारताने पाकिस्तानविरुद्ध आशिया कप स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. पण लोक भावना लक्षात घेऊन पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही. इतकंच काय तर कोणताच संपर्क साधला नाही. भारत पाकिस्तान तीन वेळा या स्पर्धेत आमनेसामने आले. पण तिन्ही वेळेस भारतीय कर्णधार आणि खेळाडूंनी तसाच पवित्रा ठेवला. त्यामुळे पाकिस्तान जगभरात नाचक्की झाली. अब्रू गेल्यानंतर अँडी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याचा आणि युएईविरुद्ध न खेळण्याचा कांगावा केला. पण त्यातही पाकिस्तानची लाजच गेली. भारताने पाकिस्तानला साखळी, सुपर 4 आणि अंतिम फेरीत पराभूत केलं. भारताच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत लिहिलं की, ‘खेळाच्या मैदानावर ऑपरेशनसिंदू.. . निकाल एकच आहे. भारत जिंकला! आपल्या क्रिकेटपटूंचे अभिनंदन.’ भारताच्या विजयानंतर काही मिनिटातच त्यांनी ट्वीट केलं. 22 एप्रिल 2025 रोजी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांचे बळी घेतले होते. तेव्हा भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला धडा शिकवला होता. आता क्रिकेटच्या मैदानातही भारताने पाकिस्तानला धडा शिकवला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही ट्वीट करत भारतीय संघाचं अभिनंदन केलं. “एक अद्भुत विजय. आमच्या मुलांच्या प्रचंड उर्जेने पुन्हा एकदा विरोधकांना पराभूत केले आहे. मैदान कोणतेही असो, भारत जिंकणारच हे निश्चित आहे.”, असं ट्वीट त्यांनी केलं.

दरम्यान, या सामन्यात तिलक वर्माची खेळी महत्त्वाची ठरली. पाकिस्तानने विजयासाठी 147 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारताने 19.4 षटकात पूर्ण केलं. पॉवर प्लेमध्ये तीन विकेट गमावल्यानंतर हा सामना हातून निसटला अशा भावना होत्या. पण तिलक वर्माची नाबाद खेळी आणि संजू सॅमसन-शिवम दुबेचं योगदान महत्त्वाचं ठरलं. तिलक वर्माने 53 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकार मारत नाबाद 69 धावा केल्या.