Team India Party: टीम इंडियाची RRR च्या सुपरस्टारसोबत पार्टी, रोहित-विराटने पार्टीकडे फिरवली पाठ

Team India Party: टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये उद्यापासून वनडे सीरीज सुरु होणार आहे. या महत्त्वाच्या मॅचआधी टीम इंडियाचे खेळाडू एका पार्टीत रमले होते.

Team India Party: टीम इंडियाची RRR च्या सुपरस्टारसोबत पार्टी, रोहित-विराटने पार्टीकडे फिरवली पाठ
jr ntr partyImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 2:32 PM

हैदराबाद: टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये उद्यापासून वनडे सीरीज सुरु होणार आहे. या महत्त्वाच्या मॅचआधी टीम इंडियाचे खेळाडू एका पार्टीत रमले होते. मोठ्या मॅचआधी खेळाडूंना रिलॅक्स होण्यासाठी अशा प्रकारच आयोजन कधी, कधी आवश्यक असतं. तेलगु सुपरस्टार ज्यूनियर एनटीआरच्या पार्टीला टीम इंडियाचे खेळाडू उपस्थित होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यूनियर एनटीआरच्या ‘RRR’ चित्रपटाला गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाला. त्यासाठी ही ज्यूनियर एनटीआरने हैदराबादमध्ये ही पार्टी ठेवली होती. ‘RRR’ चित्रपटातील नाटू, नाटू गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध वनडे सामन्यासाठी हैदराबादमध्ये आहे. हा योगाय़ोग जुळून आल्याने टीम इंडियाचे खेळाडू या पार्टीला हजर होते. या पार्टीच्या निमित्ताने क्रिकेट आणि टॉलिवूड एकत्र आलं होतं.

रोहित-विराटने पार्टीकडे फिरवली पाठ

हे सुद्धा वाचा

ज्यूनियर NTR च्या फॅन्सनी त्याचे टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले. सूर्यकुमार यादव, इशान किशन, युजवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर आणि शुभमन गिल या पार्टीला हजर होते. एकाफोटोमध्ये भारतीय खेळाडूंच्या मागे महागड्या गाड्या दिसत आहेत. या सर्व ज्यूनियर एनटीआरच्या कार असण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ज्यूनियर NTR च्या पार्टीकडे पाठ फिरवली.

सूर्याने टि्वट केला फोटो

एकाफोटोमध्ये ज्यूनियर एनटीआर, सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी दिसत आहेत. सूर्यकुमारने हा फोटो त्याच्या टि्वटरव शेअर केलाय. ‘तुला भेटून आनंद झाला भावा’ असं सूर्याने म्हटलय. गोल्डन ग्लोबमध्ये RRR ला यश मिळाल्याबद्दल अभिनंदन असं सूर्याने त्याच्या टि्वटमध्ये मह्टलं आहे. ‘नाटू नाटू’ या गाण्याची कोरिओग्राफी कोणी केली?

‘नाटू नाटू’ या गाण्यावरील डान्सची कोरिओग्राफी प्रेम रक्षितने केली आहे. या गाण्याला कोरिओग्राफ करायला प्रेम रक्षित यांना दोन महिने लागले. या संपूर्ण गाण्यात त्याने रामचरण आणि ज्युनिअर एनटीआरसाठी 110 स्टेप्स तयार केले होते. या संपूर्ण प्रवासात राजामौली यांनी खूप साथ दिल्याचं त्याने म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी..,शिंदेंचा घणाघात
दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी..,शिंदेंचा घणाघात.
तुझी लायकी XXX...पवारांच्या कार्यकर्त्याला दादांच्या आमदारांची शिवीगाळ
तुझी लायकी XXX...पवारांच्या कार्यकर्त्याला दादांच्या आमदारांची शिवीगाळ.
मतदानावेळी ताई दादांच्या घरी? दादांच्या बंगल्यावर ताई का आल्या?
मतदानावेळी ताई दादांच्या घरी? दादांच्या बंगल्यावर ताई का आल्या?.
महाराष्ट्रात कुठं किती टक्के मतदान? कुठ झाली कमाल तर कुठं वाढल टेन्शन?
महाराष्ट्रात कुठं किती टक्के मतदान? कुठ झाली कमाल तर कुठं वाढल टेन्शन?.
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.