टीम इंडियाच्या खेळाडूंना थेट आदेश , बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी करावे लागेल हे काम

पाकिस्तानसारख्या दिग्गज संघाला पराभूत केल्याने बांग्लादेश संघाची जोरदार चर्चा रंगली आहे. दिग्गज संघानी आता धास्ती घेण्यास सुरुवात केली आहे. या कसोटी मालिकेवर भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित अवलंबून आहे. त्यामुळे खेळाडूंना एक थेट आदेश दिला गेला आहे.

टीम इंडियाच्या खेळाडूंना थेट आदेश , बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी करावे लागेल हे काम
Follow us
| Updated on: Sep 04, 2024 | 8:39 PM

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरला होणार आहे. तत्पूर्वी भारतीय खेळाडू देशांतर्गत दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळणार आहे. ही स्पर्धा 5 सप्टेंबरपासून खेळली जाणार आहे. दुलीप ट्रॉफीत शुबमन गिल, केएल राहुल, कुलदीप यादव, यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंतसारखे दिग्गज खेळाडू खेळणार आहेत. दुलीप ट्रॉफीचा पहिला सामना संपताच भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे खेळाडूंची पुढचं सर्व गणित देशांतर्गत दुलीप ट्रॉफीवर अवलंबून आहे. साधारणत: 8 सप्टेंबरला संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. संघाची निवड झाल्यानंतर खेळाडूंना आणखी एक आदेश देण्यात आला आहे. 12 सप्टेंबरला निवड झालेल्या खेळाडूंना चेपॉक मैदानावर एकत्र यायचं आहे. येथे भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी सराव सुरु करणार आहे. तर बांगलादेशचा संघ 15 सप्टेंबरपासून सराव करणार आहे.

गौतम गंभीरच्या नेतृत्वात ही पहिली कसोटी मालिका आहे. यापूर्वी गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. टी20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाची वनडे मालिकेत नाचक्की झाली होती. दिग्गज खेळाडू असूनही टीम इंडियाला विजय मिळवता आला नव्हता. तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0 ने गमवावी लागली होती. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर कोणतीही जोखीम घेण्यास तयार नसल्याचं दिसत आहे. त्यात बांगलादेशने पाकिस्तानला त्यांच्यात भूमीवर धोबीपछाड दिल्याने धाकधूक वाढली आहे. कारण ही मालिका भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. बांगलादेशविरुद्धची मालिका 2-0 ने जिंकली तर भारताचा अंतिम फेरीसाठी दावा आणखी मजबूत होणार आहे. भारताने यापूर्वी देशात इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. पहिल्या सामना गमावल्यानंतर भारताने जबरदस्त कमबॅक केलं होतं. तसेच इंग्लंडला 4-1 ने पराभूत केलं होतं. बांग्लादेश आणि भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना 19 ते 23 सप्टेंबर आणि दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान असणार आहे.

चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ...
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ....
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ.
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख.
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?.