
कर्णधार शुबमन गिल याने केलेल्या विक्रमी खेळीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात सर्वबाद 587 धावा केल्या आहेत. भारतासाठी शुबमनने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर ऑलराउंडर रवींद्र जडेजा आणि ओपनर यशस्वी जैस्वाल यांनीही प्रत्येकी 80 पेक्षा अधिक धावा केल्या. त्यामुळे भारताला 580 पार मजल मारता आली. तर इंग्लंडसाठी शोएब बशीर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल ही सलामी जोडी मैदानात आली. मात्र केएल राहुल स्वस्तात आऊट झाला.केएलने 2 धावा केल्या. त्यानंतर करुण नायर मैदानात आला. यशस्वी आणि करुण या दोघांनी चांगली बॅटिंग केली आणि भारताला 95 धावांपर्यंत पोहचवलं. मात्र त्यानतंर ब्रायडन कार्स याने करुणला 31 धावांवर बोल्ड केलं. भारताने 161 धावांवर यशस्वी जैस्वाल याच्या रुपात तिसरी विकेट गमावली. यशस्वीने 107 बॉलमध्ये 13 फोरसह 87 रन्स केल्या.
उपकर्णधार ऋषभ पंत याला चांगली सुरुवात मिळाली. मात्र पंत मोठी खेळी करु शकला नाही. पंतने 25 धावा केल्या. नितीश कुमार रेड्डी 1 धाव करुन मैदानाबाहेर परतला. ख्रिस वोक्सने नितीशला बोल्ड केलं. नितीश आऊट झाल्याने भारताची स्थिती 5 बाद 211 अशी झाली.
त्यानंतर कर्णधार शुबमन गिल याची साथ देण्यासाठी ऑलराउंडर रवींद्र जडेजा मैदानात आला. या जोडीने केलेल्या निर्णायक भागीदारीमुळे भारतीय संघाने इंग्लंडला बॅकफुटवर टाकलं. शुबमन-जडेजाने सहाव्या विकेटसाठी 203 धावांची द्विशतकी भागीदारी केली. मात्र जडेजा शतक करण्यापासून वंचित राहिला. जडेजाने 137 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 10 फोरसह 89 रन्स केल्या.
जडेजा आऊट झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर मैदानात आला. सुंदरनेही भारताच्या भक्कम स्थितीचा फायदा मनसोक्त फटकेबाजी केली. शुबमन आणि वॉशिंग्टन जोडीने सातव्या विकेटसाठी 144 धावांची भागीदारी केली. वॉशिंग्टनने 42 धावांचं योगदान दिलं.
भारताच्या पहिल्या डावात 587 धावा
Innings Break!
A mighty batting display from #TeamIndia! 🙌 🙌
2⃣6⃣9⃣ for captain Shubman Gill
8⃣9⃣ for Ravindra Jadeja
8⃣7⃣ for Yashasvi Jaiswal
4⃣2⃣ for Washington SundarUpdates ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#ENGvIND | @ShubmanGill | @imjadeja | @ybj_19 | @Sundarwashi5 pic.twitter.com/WkhwqLxXJB
— BCCI (@BCCI) July 3, 2025
वॉशिंग्टननंतर कर्णधार शुबमन आऊट झाला. शुबमनने 387 बॉलमध्ये 30 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 269 रन्स केल्या. आकाश दीप याने 6 धावा केल्या. तर मोहम्मद सिराज 8 धावांवर बाद होताच भारताचा डाव आटोपला. भारताने अशाप्रकारे 151 षटकांमध्ये 587 धावा केल्या. इंग्लंडसाठी शोएब व्यतिरिक्त ख्रिस वोक्स आणि जोश टंग या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर ब्रायडन कार्स, कॅप्टन बेन स्टोक्स आणि जो रुट या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.