AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाने टाकले असे फासे, 20 दिवसात खेळणार 8 सामने

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचे वेध आतापासून लागले आहेत. कारण या स्पर्धेसाठी सात महिन्यांचा अवधी शिल्लक राहीला आहे. यासाठी टीम इंडियाने कंबर कसली आहे. या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाने जानेवारीत खास प्लान आखला आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाने टाकले असे फासे, 20 दिवसात खेळणार 8 सामने
भारत न्यूझीलंडImage Credit source: Hannah Peters/Getty Images
| Updated on: Jun 12, 2025 | 5:59 PM
Share

आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा पुढच्या वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. त्यामुळे भारतीय संघाकडून सलग दुसऱ्या जेतेपदाची अपेक्षा आहे. भारताने वेस्ट इंडिज अमेरिकेत भरवलेल्या 2024 स्पर्धेचं जेतेपद मिळवलं होतं. आता तशीच अपेक्षा 2026 टी20 वर्ल्डकपमध्ये आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी भारताने एक खास रणनिती आखल्याचा एक रिपोर्ट समोर आला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडिया व्हाइट बॉल मालिका खेळताना दिसणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध व्हाइट बॉल मालिका खेळणार असल्याचं बोललं जात आहे. न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे. ही मालिका 11 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान खेळवली जाईल. यात तीन वनडे आणि पाच टी20 सामन्यांची मालिका असणार आहे. ही मालिका टी20 वर्ल्डकप आधीच असल्याने फायदेशीर ठरणार आहे.

रिपोर्टनुसार, टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा 8 फेब्रुवारी 2026 ते 8 मार्च 2026 दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ भाग घेणार आहेत. त्यामुळे न्यूझीलंड संघालाही स्पर्धेपूर्वी भारतीय खेळपट्ट्यांचा अंदाज घेण्याची संधी मिळेल. न्यूझीलंड संघाच्या खेळाडू मालिकेनंतर थेट टी20 वर्ल्डकप खेळण्यासाठी उतरतील. सध्या भारतीय टी20 संघाची धुरा सूर्यकुमार यादवच्या हाती सोपवली आहे. सूर्यकुमार यादवने आयपीएल 2025 स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याचा फॉर्म जबरदस्त आहे. असं असताना सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची संधी असणार आहे. पहिल्यांदाच 20 संघ या स्पर्धेत भाग घेणार आहेत. त्यामुळे 55 सामने होण्याची शक्यता आहे. लढाई आणखी चुरशीची होणार यात काही शंका नाही.

आयपीएल 2025 स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे काही खेळाडूंना टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत संधी मिळू शकते. दरम्यान, भारतीय क्रीडारसिक न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेची वाट पाहात आहे. कारण या मालिकेत अनुभवी आणि युवा खेळाडूंचा तालमेल पाहायला मिळणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी वनडे संघातून निवृत्ती घेतलेली नाही. त्यामुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळण्याची शक्यता आहे.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.