AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : केएल-यशस्वीचा कारनामा, पहिल्याच सामन्यात गावस्कर-श्रीकांतचा महारेकॉर्ड उद्धवस्त

Yashasvi Jaiswal KL Rahul Leeds Partnership : केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल टीम इंडियाच्या या सलामी जोडीने इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात इतिहास घडवला आहे. या दोघांनी 39 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

ENG vs IND : केएल-यशस्वीचा कारनामा, पहिल्याच सामन्यात गावस्कर-श्रीकांतचा महारेकॉर्ड उद्धवस्त
Yashasvi Jaiswal and KL Rahul IND vs ENGImage Credit source: Getty Images
| Updated on: Jun 20, 2025 | 7:48 PM
Share

भारतीय क्रिकेट संघाच्या यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल या सलामी जोडीने शुबमन गिल याच्या नेतृत्वात पहिल्या कसोटी सामन्यात अप्रतिम सुरुवात केली आहे. केएल आणि यशस्वी या दोघांनी शानदार बॅटिंग करत इंग्लंडला विकेटसाठी संघर्ष करायला लावला. यशस्वी आणि केएल जोडीने हेडिंग्ले लीड्समध्ये पहिल्या विकेटसाठी 149 बॉलमध्ये 91 रन्सची पार्टनरशीप केली. या दोघांनी 91 पैकी 64 धावा या चौकारांच्या मदतीने केल्या. दोघांनीही प्रत्येकी 8-8 चौकार लगावले. मात्र लंचआधी इंग्लंडने जोरदार कमबॅक केलं. इंग्लंडने लंचआधीच्या शेवटच्या 5 बॉलमध्ये टीम इंडियाला 2 झटके दिले. इंग्लंडने अशाप्रकारे भारतीय संघाला पहिल सत्रं नावावर करण्यापासून रोखलं.

टीम इंडियाने लीड्समध्ये लंचपर्यंत 25.4 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 92 रन्स केल्या. टीम इंडियाच्या सलामी जोडीने लीड्समध्ये या 91 धावांच्या भागीदारीसह इतिहास घडवला. टीम इंडियाची 2011 नंतर सेना देशात 90 पेक्षा अधिक धावांची भागीदारी करण्याची ही पाचवी वेळ ठरली. विशेष म्हणजे या पाचही भागीदारींमध्ये योगदान दिलं आहे. तर यशस्वी आणि केएलची अशी कामगिरी करण्याची ही चौथी वेळ ठरली.

गावसकर-श्रीकांत जोडीचा रेकॉर्ड ब्रेक

केएल आणि यशस्वी या जोडीने या सलामी भागीदारीसह दिग्ग्ज सुनील गावसकर आणि के श्रीकांत या दिग्गज माजी जोडीचा रेकॉर्ड ब्रेक केला. या दोघांनी 1986 साली लीड्समध्ये सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतकी भागीदारी केली होती. या जोडीने 64 धावांची भागीदारी केली होती.भारताने तेव्हा हा सामना जिंकला होता.

2011 नंतरची पाचवी वेळ

दरम्यान भारतीय संघाच्या सलामी जोडीची सेना देशात 2011 नंतर 90 पेक्षा अधिक धावांची भागीदारी करण्याची ही पाचवी वेळ ठरली. टीम इंडियाच्या सलामी जोडीने इंग्लंडमध्ये 3 वेळा तर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात प्रत्येकी 1-1 वेळा हा कारनामा केला आहे.

सलामी जोडीचा ‘पंच’

केएल आणि रोहित शर्मा या सलामी जोडीने 2021 साली नॉटिंगघममध्ये ही कामगिरी केली होती. त्यानंतर त्याच वर्षात याच जोडीने ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये असंच केलं होतं. दक्षिण आफ्रिकेत 2021 मध्ये केएल राहुल आणि मयंक अग्रवाल या जोडीने 90 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली होती. तर गेल्या वर्षी अर्थात 2024 साली केएल राहुल आणि यशस्वीने 90 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली होती.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.