बुमराहला यायचा खूप राग, तरी कसा झाला भारताचा मुख्य गोलंदाज, स्वत:च खोलली गुपितं

जसप्रीत बुमराहने 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिेकटमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून आतापर्यंत बुमराह नव नवी यशाची शिखरं सर करत आहे. सध्या तो भारतीय गोलंजीचा म्होरक्या आहे.

बुमराहला यायचा खूप राग, तरी कसा झाला भारताचा मुख्य गोलंदाज, स्वत:च खोलली गुपितं
यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह

मुंबई : सध्या खेळत असलेल्या भारतीय क्रिकेट संघातील (Indian Cricket Team) गोलंदाजी विभागाचा प्रमुख म्हणजे जसप्रीत बुमराह. देशातील खेळपट्टीसह परदेशातही बुमराहने आपली कमाल दाखवल्याने त्याला प्रमुख भारतीय गोलंदाज म्हटलं जात. बुमराहने 2016 मध्ये पदार्पण केल्यापासून आतापर्यंत अनेक सामना जिंकवून देणारे ओव्हर टाकले आहेत. त्याच्या गोलंदाजीची कमाल सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यातही बिखरेल अशी आशा सर्वांनाच आहे. (Team Indias Main Bowler Jasprit Bumrah Tells How he controled his Anger And it helps him to became best in ICC interview)

दरम्यान बुमराहचा इथवरचा प्रवास इतका सोपा नसून त्याने त्याची बोलिंग सुधारण्यासह रागावर कसं नियत्रंण मिळवलं हे एका मुलाखतीत सांगितल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाला (ICC) बुमराहने दिलेल्या मुलाखतीत त्याने हा खुलासा केला.

रागावर मिळवलं नियंत्रण

बुमराहने सांगितलं की, ‘सुरुवातीला मला खूप राग यायचा. पण हळूहळू मी माझ्या रागावर नियंत्रण मिळवायला शिकलो. मी माझ्या रागाचा योग्य प्रकारे वापर करु शकेन, हाच माझा कायम प्रयत्न असतो. सुरुवातीला मी जेव्हा खूप राग करायचो त्याचा माझ्या खेळावर विपरीत परिणाम व्हायचा. पण आता इतके वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असल्याने मला रागावर नियंत्रण मिळवता आलं आहे. पण तरी माझ्यात जो राग आहे तो मी दाखवत नसलो तरी त्यानेच मला माझ्या खेळात फायदा मिळतो.’

वेगळ्या गोलंदाजीचा फायदा

इतर गोलंदाजाच्या तुलनेत बुमराहची गोलंदाजी करण्याची स्टाईल बरीच वेगळी आहे. त्यामुळे फलंदाजाना त्याचा बॉल कसा येईल? हे कळत नाही. ज्यामुळे बुमराहला फायदा होतो. भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण म्हणाले, “बुमराहचे यशामागे एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्याचा वेगळा अंदाज. त्यामुळे आम्ही त्याची गोलंदाजीची स्टाईल बदलण्याचाही विचार केला नाही.

हे ही वाचा :

ICC WTC Final : 196 ओव्हर ठरवणार विजेता, जाणून घ्या कोणता संघ होणार विजयी

WTC Final 2021 : फायनल सामना ड्रॉ झाला तर भारताला मोठं नुकसान, न्यूझीलंड फायद्यात!

WTC Final सामन्यातील भारतीय गोलंदाजाच्या काही सुपरफास्ट डिलेव्हरीज, आयसीसीने शेअर केलेला ‘हा’ व्हिडीओ पाहाच

(Team Indias Main Bowler Jasprit Bumrah Tells How he controled his Anger And it helps him to became best in ICC interview)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI