पोलिसातील नोकरी सोडून क्रिकेटमध्ये पदार्पण, भारतीय संघाला धुळ चारल्यानंतर बदलला देश, दुसऱ्या देशाच्या संघाकडून खेळण्यास सुरवात

सलामीच्या सामन्यात अप्रतिम कामगिरी केल्यानंतर या खेळाडूच्या क्रिकेट कारकिर्दीने वेगळेच वळण घेतले. काही सामने खेळण्यानंतर देश बदलून दुसऱ्याच देशाच्या संघाकडून खेळण्यास त्याने सुरुवात केली.

पोलिसातील नोकरी सोडून क्रिकेटमध्ये पदार्पण, भारतीय संघाला धुळ चारल्यानंतर बदलला देश, दुसऱ्या देशाच्या संघाकडून खेळण्यास सुरवात
प्रतिकात्मक फोटो

मुंबई : एखाद्या देशाकडून क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूने अचानक संघ बदलून दुसऱ्या देशाकडून खेळण्यास सुरुवात केली. अशी उदाहरण जास्त नसून यातीलच एक उदाहरण अशा खेळाडूचे आहे ज्याने सलामीच्या सामन्यात धडाकेबाज कामगिरी केली मात्र काही वर्षांनी थेट देश सोडून जात दुसऱ्या देशाकडून खेळण्यास सुरुवात केली. या खेळाडूने् एका सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला (Indian Cricket Team) एका लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जाण्यासही भाग पाडलं होतं. या खेळाूडच नाव एडम सॅनफोर्ड (Adam Sanford) असं असून आज 12 जुलै रोजीच त्याचा जन्म झाला होता.

एडमने हा मूळचा वेस्टइंडीजचा असून डोमिनिका इथे  12 जुलै 1975 रोजी त्याचा जन्म झाला होता. वेस्‍टइंडीज (West Indies Cricket Team) संघाकडून खेळणारा हा खेळाडू आधी एंटीगामध्ये पोलिसांची नोकरी करत होता. पण नंतर क्रिकेटचे वेड लागल्याने त्याने सरावाच्या आणि उत्कृष्ठ खेळाच्या जोरावर संघात स्थान मिळवलं. 11 एप्रिल, 2002 रोजी भारताविरोधात त्याने जॉर्जटाउन टेस्‍टमध्ये आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सामन्यात त्याने अप्रतिम प्रदर्शन केले. त्याने मालिकेत 15 विकेट्स घेत सीरीज  1-2 च्या फरकाने भारताकडून हिसकावून घेत एका लाजीरवाण्या पराभावाला सामोरं जाण्यास भाग पाडलं. या कामगिरीमुळे त्याला न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रीका दौऱ्यासाठी संघात निवडले गेले.

2013 अमेरिका संघातून खेळला क्रिकेट

एडम सॅनफोर्ड याने वेस्‍टइंडीज संघाकडून 2002 ते  2004  पर्यंत क्रिकेट खेळले. यावेळी 11 टेस्‍टमध्ये त्याने संघात स्थान मिळवलं. या 11 कसोटी सामन्यात त्याने 30 विकेट्स पटकावले. यानंतर अचानक तो वेस्ट इंडिज सोडून अमेरिकेला निघून गेला. तिथे जाऊन तो अमेरिका संघाकडून क्रिकेट खेळू लागला. 2013 मध्ये त्याने अमेरिका संघातून तीन टी-20 सामने खेळले. सॅनफोर्डने 57 प्रथम श्रेणी सामन्यात 198 विकेट्स मिळवले आहेत. एका डावांत 40 दावा देत 7 विकेट्स हे त्याचे सर्वोत्कृष्ठ प्रदर्शन राहिले.

हे ही वाचा :

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये धडाकेबाज कामगिरीचा फायदा, ‘या’ खेळाडूला मिळाला ICC Players of the Month चा पुरस्कार

अभूतपूर्व! हरलीनने टिपलेल्या झेलाचे मोदींकडूनही कौतुक, इन्स्टाग्राम स्टोरीतून केलं अभिनंदन

India W vs England W, 2nd T20 : उत्कृष्ठ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर भारतीय महिला विजयी, इंग्लंडवर 8 धावांनी मात

(Team West Indies Formar Cricketer Adam Sanford Birthday Today)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI