AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेटमध्ये आता असा शॉट खेळण्यास मनाई, नियमाचा गोलंदाजांना होणार थेट फायदा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलने क्रिकेटमध्ये नव्या नियमाची भर घातली आहे. त्यामुळे फलंदाजांना आता शॉट मारताना काळजी घ्यावी लागणार आहे. आयसीसीचे माजी पंच अनिल चौधरी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.

क्रिकेटमध्ये आता असा शॉट खेळण्यास मनाई, नियमाचा गोलंदाजांना होणार थेट फायदा
क्रिकेटमध्ये आता असा शॉट खेळण्यास मनाई, नियमाचा गोलंदाजांना होणार थेट फायदाImage Credit source: Twitter
| Updated on: Oct 18, 2025 | 4:29 PM
Share

क्रिकेटची सुरुवात झाल्यापासून त्यात कालांतराने बदल होत गेले. खऱ्या अर्थाने क्रिकेटमधील पळवाटा थांबवत त्या नियमांची आखणी करण्यात आली. क्रिकेटमधील उत्साह वाढवण्यासाठी मॅरीलेबोन क्रिकेट क्लबने नवे नियम तयार करते. आता क्रिकेटन आणखी एका नव्या नियमाची भर पडली आहे. फलंदाजांची डोकॅलिटी पाहूनच आयसीसीने हा नियम तयार केला आहे. त्यामुळे फलंदाजांना आता शॉट मारताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आयसीसीचे माजी पंच अनिल चौधरी यांनी या नियमाबाबत व्हिडीओ शेअर केला आहे.

आयसीसीचा नवा नियम काय सांगतो?

आयसीसीच्या नव्या नियमानुसार, आता फलंदाजाला स्टम्पच्या मागे जाऊन फटकेबाजी करता येणार नाही. म्हणजेच जर एखादा फलंदाज स्टंपच्या मागे जाऊन फटका मारत असेल तर तो शॉट डेड बॉल घोषित केला जाईल. या स्थितीत कोणत्याही धावा मिळणार नाहीत. तसेच गोलंदाजाला एक निर्धाव चेंडू मिळणार आहे. अशा खेळीत जर फलंदाज त्रिफळाचीत झाला तर तो आऊटच असेल. हा नियम टी20, वनडे आणि कसोटीसाठी लागू असणार आहे. त्यामुळे आता फलंदाजांना असं करून चालणार नाही. खासकरून टी20 क्रिकेटमध्ये असे शॉट्स बऱ्याचदा खेळले जातात. आयसीसीचे माजी पंच अनिल चौधरी यांनी हा नियम काय ते समजावून सांगितलं आहे.

कायरन पोलार्ड अनेकदा खेळलाय असा शॉट

वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू कायरन पोलार्ड अनेकदा असा शॉट खेळताना दिसला आहे. चेंडू टाकल्यानंतर स्टंपच्या मागे जाऊन फटका मारण्यास तरबेज होता. गोलंदाजांना संभ्रमात टाकण्यासाठी विकेटच्या मागे जायचा. गोलंदाजाला अडचणीत आणून क्षेत्ररक्षण बिघडवण्यासाठी असं करायचा. मात्र एखाद्या फलंदाजाचा पाय किंवा त्याच्या शरीराचा कोणताही भाग खेळपट्टीच्या पृष्ठभागावर स्पर्श करत नसेल, तर पंच हा चेंडू डेड घोषित करतील. चौकार किंवा षटकार मारला तरी त्या धावा गणल्या जाणार नाहीत. त्यामुळे फलंदाजाला आता असा फटका मारण्यापूर्वी विचार करावा लागणार आहे.

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.