India Vs Pakistan सामन्यापूर्वी बीसीसीआयने महिला क्रिकेट संघाला दिला थेट आदेश, सांगितलं की…
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 5 ऑक्टोबरला भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना होणार आहे. आशिया कप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामन्याच्या वादाची किनार या सामन्यातही असणार आहे. या सामन्यापूर्वी बीसीसीआयने महिला संघाला थेट आदेश दिला आहे.

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. हा सामना 5 ऑक्टोबरला श्रीलंकेतील कोलंबो येथे होणार आहे. यासाठी टीम इंडिया कोलंबोत पोहोचली आहे. या सामन्याआधीच हँडशेक करणार का? वगैरे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. आशिया कप स्पर्धेवर आयसीसीचं अधिपत्य नव्हतं. त्यामुळे आयसीसीने त्या प्रकरणात फार काही लक्ष घातलं नाही. पण आता वनडे वर्ल्डकप स्पर्धा आयीसीसीच्या अधिपत्याखाली आहे. त्यामुळे भारतीय महिला संघ काय करणार? याकडे लक्ष लागून आहे. रिपोर्टनुसार, बीसीसीआयने भारतीय महिला संघाला स्पष्ट आदेश दिले आहेत की, पाकिस्तानी खेळाडूंसोबत नो हँडशेक पॉलिसी कायम ठेवा. दुसरीकडे, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा उल्लेख शत्रूराष्ट्र असा केला आहे. त्यामुळे या सामन्यातही आशिया कप स्पर्धेसारखंच चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नाणेफेकीवेळी आणि सामना संपल्यानंतर हँडशेक होणार नाही, हेच यावरून स्पष्ट दिसत आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने महिला संघाला स्पष्ट आदेश दिले आहेत की पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करू नका. टीम इंडिया हा आदेश 1 ऑक्टोबरला दिला गेला आहे. रिपोर्टनुसार, ‘वर्ल्डकपमध्येही टीम इंडिया पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणारन नाही. बीसीसीआयच्या उच्च अधिकाऱ्यांनी संघाला याबाबत सांगितलं आहे. भारतीय बोर्ड आपल्या खेळाडूंसोबत असेल.’ दरम्यान, पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. कारण भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर तटस्थ ठिकाणी खेळण्यावर एकमत झालं होतं.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला धडा शिकवला आहे. इतकंच काय तर प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. खेळाच्या मैदानातही भारताने हीच रणनिती अवलंबली आहे. दरम्यान, आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानच्या मोहसिन नकवीच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यानंतर ते ट्रॉफी आपल्यासोबत घेऊन गेले. त्यामुळे नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. आता याप्रकरणी दुबई पोलिसात तक्रार दाखल केली जाण्याची शक्यता आहे.
