AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कन्फर्म! या तारखेला होणार आयपीएल 2026 स्पर्धेसाठी मिनी लिलाव, ठिकाणही ठरलं

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी होणाऱ्या मिनी लिलावाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. त्यात फ्रेंचायझींना रिटेन्शन लिस्ट 15 नोव्हेंबरपर्यंत सोपवायची आहे. त्यानंतर मिनी लिलावात रजिस्टर्ड खेळाडूंची यादी पाठवेल आणि त्या खेळाडूंवर बोली लागेल.

कन्फर्म! या तारखेला होणार आयपीएल 2026 स्पर्धेसाठी मिनी लिलाव, ठिकाणही ठरलं
कन्फर्म! या तारखेला होणार आयपीएल 2026 स्पर्धेसाठी मिनी लिलाव, ठिकाणही ठरलंImage Credit source: TV9 Network/Hindi/AFP
| Updated on: Nov 13, 2025 | 8:40 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेची आतापासूनच जोरदार चर्चा रंगली आहे. कारण फ्रेंचायझींनी आपल्या संघासाठी आवश्यक असलेल्या खेळाडूंची जमवाजमव सुरु केली आहे. फ्रेंचायझींना रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी 15 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजेपर्यंत सोपवायची आहे. यानंतर फ्रेंचायझी नोंदणीकृती खेळाडूंची यादी पाठवेल. यातून सर्व फ्रेंचायझी खेळाडूंना शॉर्टलिस्ट करतील आणि त्यानंतर लिलावाची रूपरेषा ठरेल. ट्रेड विंडो ऑक्शनच्या एक आठवड्यापर्यंत सुरू असेल. त्यानंतर मात्र खेळाडूंसाठी ट्रेड करता येणार नाही. पण मिनी लिलाव होणार कधी? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

16 डिसेंबरला अबूधाबीत मिनी लिलाव प्रक्रिया पार पडेल. सलग तिसऱ्या वर्षी आयपीएलची लिलाव प्रक्रिया विदेशात होणार आहे. आयपीएल 2024 लिलाव पहिल्यांदा दुबईत झाला होता. त्यानंतर 2025 मध्ये मेगा लिलाव प्रक्रिया सौदी अरबच्या जेद्दाहमध्ये पार पडली होती. आता दुबईमध्ये दुसऱ्यांदा लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. आयपीएल लिलाव झाल्यानंतर स्पर्धा सुरू होण्याच्या एक महिन्या आधीपर्यंत ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडूंची देवाणघेवाण करता येईल. पण मिनी लिलाव 2026 मध्ये घेतलेल्या खेळाडूंची ट्रेड करता येणार नाही.

आयपीएल रिटेन्शन यादी जाहीर करण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने दोन खेळाडूंची यशस्वी डील केली आहे. मुंबई इंडियन्स लखनौ सुपर जायंट्सकडून शार्दुल ठाकुर आणि गुजरात टायटन्सकडून रूदरफोर्डला संघात घेतलं आहे. शार्दुल ठाकुरसाठी 2 कोटी, तर रूदरफोर्डसाठी 2.6 कोटी रुपये मोजले आहे. आता मुंबई इंडियन्स कोणत्या खेळाडूंना रिलीज करते याची उत्सुकता लागून आहे. कारण मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने जवळपास सर्वच पैसे खर्च केले होते आणि पर्समध्ये फक्त 17 लाख होते. आता दोन खेळाडू घेतल्याने कोणाचा नंबर लागतो याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

मागच्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यामुळे त्या फ्रेंचायझीच्या रणनितीकडेही लक्ष असणार आहे. कोणत्या खेळाडूंवर बाजी लावणार आणि कोणाला सोडणार याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष असेल. लखनौ सुपर जायंट्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स यांनी एकदाही जेतेपद मिळवलेलं नाही. त्यामुळे या संघांच्या बांधणीकडेही लक्ष असेल.

महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.