IND vs SA T20 Series: भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेला 9 जूनपासून सुरुवात, दोन्ही संघातील तुल्यबळ खेळाडूंमध्ये पाहायला मिळणार संघर्ष

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने आयपीएल 2022 मध्ये 600 हून अधिक धावा केल्या. तसेच दुसरीकडे, कागिसो रबाडा सर्वाधिक 23 बळी घेणारा तिसरा गोलंदाज होता.

IND vs SA T20 Series: भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेला 9 जूनपासून सुरुवात, दोन्ही संघातील तुल्यबळ खेळाडूंमध्ये पाहायला मिळणार संघर्ष
भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेला 9 जूनपासून सुरुवातImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 9:50 AM

नवी दिल्ली – भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील टी-20 मालिकेला 9 जूनपासून सुरुवात होत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या स्टार खेळाडूंशिवाय भारतीय संघ खेळणार आहे. भारतात आयपीएल क्रिकेट स्पर्धेमुळे अनेक खेळाडू उदयास आले आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2022) चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय संघातील खेळाडू केएल राहुल टीम यांच्याकडे संघाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे भारताचा सध्याचा संघ जरी नवा असला तरी संघातील खेळाडूंनी आयपीएलच्या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघही मजबूत दिसत असल्याने भारतासाठी ही मालिका सोपी जाणार असं अनेक जाणकारांनी जाहीर केलं आहे. पण दोन्ही संघात संघर्ष निश्चित होईल.

केएल राहुलने आणि कागिसो रबाडामध्ये होणार संघर्ष

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने आयपीएल 2022 मध्ये 600 हून अधिक धावा केल्या. तसेच दुसरीकडे, कागिसो रबाडा सर्वाधिक 23 बळी घेणारा तिसरा गोलंदाज होता. आगामी मालिकेत रबाडा आणि कर्णधार केएल राहुल यांच्या लढतीची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. केएल राहुलला भारतीय संघासाठी शानदार खेळी खेळून चांगली धावसंख्या उभारायला मदत करायची आहे. दुसरीकडे रबाडा राहुलला लवकर बाद करण्याचा प्रयत्न करेल.

ईशान किशनने चाहत्यांची केली नाराजी

यंदाच्या आयपीएल 2022 मध्ये सलामीवीर इशान किशनची म्हणावी तितकी कामगिरी चांगली झाली नाही. त्याने फक्त 418 केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत इशानला चांगली कामगिरी करेल अशी शक्यता आहे. पण त्याला दक्षिण आफ्रिका संघातील एनरिक नॉर्शियासारख्या चांगल्या गोलंदाजांचा सामना करावा लागेल. वेगवान गोलंदाज नोर्कियाने आयपीएल 2022 मध्ये सहा सामन्यांत नऊ विकेट घेतल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

ऋषभ पंतला कामगिरी सुधारण्याची संधी

दिल्ली कॅपिटल्सची ओळख असलेल्या ऋषभ पंत या खेळाडूने यंदाच्या आयपीएलमध्ये 340 धावा केल्या. यंदाच्या आयपीएल मोसमात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याचे चाहते देखील निराश झाले आहेत. त्यामुळे त्याला होणाऱ्या मालिकेत चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

त्याला चायनामन गोलंदाज तबरेझ शम्सी याच्याशी सामना करावा लागेल.

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.