AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : असं काय झालं की दोनदा टॉसचा कौल घ्यावा लागला! जाणून घ्या का ते

क्रिकेट स्पर्धेत नाणेफेकीचा कौल खूपच महत्त्वाचा ठरतो. कारण यावरून रणनिती आखणं सोपं होतं. त्यामुळे एकदाच होणारी नाणेफेक किती महत्त्वाची आहे हे अधोरेखित होतं. पण ऑस्ट्रेलियातील एका सामन्यात दोनदा नाणेफेकीचा कौल उडवावा लागला. नेमकं असं काय झालं ते जाणून घेऊयात..

Video : असं काय झालं की दोनदा टॉसचा कौल घ्यावा लागला! जाणून घ्या का ते
| Updated on: Dec 12, 2023 | 8:05 PM
Share

मुंबई : ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीग स्पर्धा सुरु आहे. आयपीएलनंतर या लीगची सर्वत्र चर्चा होत असते. आयपीएलनंतर बिग बॅश लीग ही लोकप्रिय स्पर्धा म्हणून गणली जाते. बीबीएलमध्ये मंगळवारी ब्रिस्टेन हीट आणि सिडनी थंडर यांच्यात सामना झाला. या सामन्यात एक विचित्र घटना पाहायला मिळाली. शक्यतो क्रिकेट सामन्यात असं कधी होत नाही. नाणेफेकीचा कौल घेताना घडली. नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर प्रत्येक जण हसू लागले. या सामन्यासाठी दोनदा टॉस करण्याची वेळ आली. याला कारण ठरली ती बॅट.. कॅनबराच्या मनुका ओव्हल मैदानामध्ये सिडनी थंडरचा कर्णधार ख्रिस ग्रीन आणि ब्रिस्बेन हीटचा कर्णधार कोलिन मुनिरो टॉससाठी आले होते. नाणेफेकीचा कौल सिडनची कर्णधार ख्रिस ग्रीनने जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

बीबीएलमध्ये कौल नाणेफेकीने नाहीतर बॅट उडवून घेतला जातो. बीबीएलच्या सुरुवातीपासून असंच केलं जात आहे. या सामन्यासाठी बॅट हवेत उडवली गेली. पण शोलेतल्या नाणेफेकीसारखी बॅट उभी पडली. यामुळे हेड की टेल सांगूनही काहीचच उपयोग झाला नाही. त्यामुळे दुसऱ्यांदा टॉस उडवण्याची वेळ आली. दुसऱ्यांदा टॉस झाला तेव्हा बॅटचा कौल ग्रीनच्या पारड्यात पडला. बीबीएलमध्ये नाणेफेकीसाठी वापरली जाणारी बॅट वेगळी असते. ही बॅट दोन्ही बाजूला चपटी असते.

आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्येही असं झालं आहे

क्रिकेटमध्ये दोनदा टॉस होण्याची ही काय पहिली वेळ नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही यापूर्वी असं घडलं आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या वनडे वर्ल्डकप २०११ स्पर्धेत अशी वेळ आली होती. यावेळी दोनदा टॉस झाला होता. या सामन्यासाठी श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकारा याने टॉससाठी कॉल दिला होता. पण मॅच रेफरी जॅफ क्रो यांना त्याचा आवाज ऐकू आला नाही. कारण वानखेडे स्टेडियममध्ये प्रेक्षकांचा खूप आवाज होता. त्यामुळे हा टॉस पुन्हा एकदा उडवण्यात आला होता.

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.