विराट आणि बीसीसीआयमध्ये तणाव, माजी मुख्य निवडकर्ता संदीप पाटील यांचा खुलासा

| Updated on: Sep 17, 2021 | 1:29 PM

आगामी टी -20 विश्वचषकानंतर विराट कोहली भारताच्या टी 20 संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याही माहिती समोर आली आहे. विराटने स्वत: त्याच्या सोशल मीडियावरुन पोस्ट करत माहिती दिली आहे.

विराट आणि बीसीसीआयमध्ये तणाव, माजी मुख्य निवडकर्ता संदीप पाटील यांचा खुलासा
विराट कोहली
Follow us on

मुंबई: भारतीय क्रिकेटमध्ये एका मोठा बदल होणार असल्याची घोषणा नुकतीच भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) केली. त्याने टी 20 विश्वचषकानंतर (T20 World Cup) टी 20 संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली. विराटने अचानकपणे हा मोठा निर्णय घेतला असून यावरुन अनेक चर्चांना उधाण आलं आहे. अशावेळी भारताचे मुख्य निवडकर्ता संदीप पाटील (Sandeep Patil) यांनी एक मोठा खुलासा करत कोहली आणि बीसीसीआय़ (BCCI) यांच्यात तणावपूर्ण वातावरण असल्याचा खुलासा केला आहे. पाटील हे मुख्य निवडकर्ता असतानाच कोहलीला पहिल्यांदा कर्णधारपद मिळालं होतं.

संदीप पाटील यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना विराटच्या निर्णयाचं स्वागत केलं. ते म्हणाले, ”मी विराटच्या निर्णयाचं स्वागत करतो. एकाच वेळी कर्णधारपद आणि फलंदाजी अशा दोन्हीवर लक्ष केंद्रीत करणं अवघड असतं. त्यामुळे विराटने हा निर्णय घेत बरोबर केलं असून त्याला यानंतर 100 टक्के त्याच्या फलंदाजीवर लक्ष देता येईल.

विराट आणि बीसीसीआयमध्ये तणाव

संदीप यांनी विराट आणि बीसीसीआय यांच्यातील संबधाबद्दल बोलताना म्हणाले, “विराट आणि बीसीसीआयमध्ये आजकाल नीट पटत नाही. दोघांमध्ये संवाद होत नसल्याने अशाप्रकारे तणाव वाढला आहे. दोघांमध्ये वाद नसल्याचं एक उदाहरण म्हणजे काही दिवसांपूर्वी विराटच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयात तत्थ नसल्याचं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं होतं. पण आता विराटने अचानक कर्णधारपद सोडत हा संपूर्णपणे त्याचा एकट्याचा निर्णय़ असल्याचं स्पष्ट झालं आहे.”

रोहित शर्माकडे टी 20 चं कर्णधारपद?

टीम इंडियाचा स्फोटक सलामीवीर अशी रोहित शर्माची ओळख आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये जबरदस्त कॅप्टन्सी करुन, मुंबई इंडियन्सला सर्वाधिक 5 विजेतेपदं मिळवून दिली आहेत.

रोहित शर्मा भारताकडून 43 कसोटी सामने खेळला आहे. यामध्ये एका द्विशतकासह 8 शतकं आणि 14 अर्धशतकं त्याने ठोकली आहेत. तर रोहित शर्माने 227 वन डे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 29 शतकं आणि 43 अर्धशतकं झळकावली आहेत. 3 द्विशतकं ठोकणारा रोहित हा एकमेव आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे.

हे ही वाचा :

IPL 2021 मध्ये आणखी एक धडाकेबाज फलंदाज, 18 चेंडूत 88 धावा करणारा ‘हा’ महारथी खेळणार कोणत्या संघातून?

Virat Kohli च्या राजीनाम्यानंतर ‘या’ दोन मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना संधी, संघाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी मिळणार?

Virat Kohli : विराट कोहलीचा मोठा निर्णय, T20 वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडणार!

(There is Tension in Betwwen Virat and BCCI says Sandeep Patil)