AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SL vs NED : नेदरलँड विरुद्ध श्रीलंका सामन्यात हे 11 खेळाडू करतील स्वप्नपूर्ती! जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि इतर बाबी

World Cup 2023, SL vs NED : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत डबल हेडर असून पहिला सामना नेदरलँड आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत चमत्कार केला आहे. तर श्रीलंकेला अजूनही पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे.

SL vs NED : नेदरलँड विरुद्ध श्रीलंका सामन्यात हे 11 खेळाडू करतील स्वप्नपूर्ती! जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि इतर बाबी
World Cup 2023, SL vs NED : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत डबल हेडर असून पहिला सामना नेदरलँड आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत चमत्कार केला आहे. तर श्रीलंकेला अजूनही पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. Image Credit source: Twitter
| Updated on: Oct 20, 2023 | 9:06 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 19 वा सामना नेदरलँड आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांचा स्पर्धेतील अस्तित्वाचा प्रश्न आहे. श्रीलंकेने तीन पैकी तीन सामने गमावले असून अजूनही विजयाची प्रतिक्षा आहे. तर नेदरलँडने दिग्गज दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत आपलं अस्तित्व दाखवून दिलं आहे. दोन्ही संघ सध्या गुणतालिकेत तळाशी आहेत. त्यामुळे हा विजय दोन्ही संघांपैकी एकासाठी संजीवनी ठरू शकतो. उत्तर प्रदेशच्या एकाना स्टेडियममध्ये हा सामना सकाळी 10.30 वाजता रंगणार आहे. दोन्ही संघ यापूर्वी कधीच एकमेकांसमोर उभे ठाकले नव्हते. त्यामुळे या दोन्ही संघातील हा पहिलाच सामना असेल. पण पात्रता फेरीत या दोन्ही संघांची लढत झाली होती. श्रीलंकेने दोन्ही सामने जिंकले होते.

पिच रिपोर्ट आणि हवामान

लखनऊच्या एकाना स्टेडियम परिसरातील वातावरण एकदम उष्ण असेल. पण दिवस मावळताना वातावरणात गारवा असेल. तापमाना 18 ते 31 अंश सेल्सियसच्या दरम्यान असेल. वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला मदत मिळेल. पण खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करणारी असेल. त्यामुळे या स्थितीचा फायदा दोन्ही संघ घेतील आणि त्या पद्धतीने प्लेइंग इलेव्हन निवडतील. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला पसंती दिली जाऊ शकते. आता हे त्या त्या संघाच्या रणनितीवर अवलंबून असेल.

श्रीलंका विरुद्ध नेदरलँड ड्रीम टीम

  • यष्टिरक्षक: कुसल मेंडिस, स्कॉट एडवर्ड्स
  • बॅटर: पथुम निसांका, कुसल परेरा
  • अष्टपैलू: बास डी लीडे, धनंजया डी सिल्वा, चारिथ असलंका
  • गोलंदाज: रोएलॉफ व्हॅन डी

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

नेदरलँड: विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर), सायब्रँड एंजेलब्रेक्ट, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.

श्रीलंका: पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, लाहिरु कुमारा, मथीशा पाथिराना.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.