ENG vs NED : इंग्लंड विरुद्ध नेदरलँड सामन्यात हे 11 खेळाडू खोलतील नशिबाचं टाळं! जाणून घ्या
वनडे वर्ल्डकप स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. उपांत्य फेरीचं गणित हळूहळू स्पष्ट होत आहे. तर इंग्लंड आणि नेदरलँडचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. पण या सामन्यात 11 खेळाडू तुमचं नशिब पालटू शकतात.

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 48 वा सामना इंग्लंड आणि नेदरलँड यांच्यात होत आहे. या दोन्ही संघांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. पण 2025 चॅम्पियनशिपच्या दृष्टीने इंग्लंडला स्पर्धेतील विजय महत्त्वाचा आहे. तर नेदरलँड शेवटच्या टप्प्यात उलटफेर करू शकते. इंग्लंड आणि नेदरलँड वनडे फॉर्मेटमध्ये सहावेळा आमनेसामने आले आहेत. सहा पैकी सहा सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आहे. तर 2003 आणि 2011 वनडे वर्ल्डकपमध्ये आमनेसामने आले होते. दुसरीकडे, नेदरलँडने या स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेला पराभूत करत मोठा उलटफेर केला आहे. त्यामुळे नेदरलँडला कमी लेखून चालणार नाही. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरकडे लक्ष असणार आहे. त्याची हवी तशी फलंदाजी झालेली नाही. तर नेदरलँडकडून बेस डी लीडे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन यांनी चांगली कामगिरी केली आहे.
पिच रिपोर्ट
इंग्लंड आणि नेदरलँड यांच्यातील सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये होणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे. त्यामुळे या मैदानात 300 च्या पार धावा होतील. गोलंदाजांना विकेट घेण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे ज्या संघाचे फलंदाजी तग धरून फटकेबाजी करतील त्या विजय निश्चित आहे. या मैदानात पहिल्यांदा काय घ्यावं हे त्या त्या संघांच्या कर्णधारांवर अवलंबून असणार आहे.
ड्रीम इलेव्हन
- कर्णधार : डेविड मलान
- उपकर्णधार : ख्रिस वोक्स
- विकेटकीपर : जोस बटलर, स्कॉट एडवर्ड्स
- बॅटर्स : डेविड मलान, जो रूट,बेन स्टोक्स
- अष्टपैलू : लोगान व्हॅन बीक, डेविड विली, बास डी लीडे
- गोलंदाज : आदिल राशिद, ख्रिस वोक्स, मार्क वूड
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
इंग्लंड: जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार आणि विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशिद, मार्क वुड
नेदरलँड: वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओ’डॉड, कॉलिन एकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर), बास डी लीडे, साकिब झुल्फिकार, लोगान व्हॅन बीक, रोलोफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन
