IND vs SA : दुसरा कसोटी सामना गमावताच या 4 जणांना बाहेरचा रस्ता? कसं काय ते समजून घ्या

भारतीय क्रिकेट संघाची घरच्या मैदानावर दैना झाल्याची स्थिती आहे. न्यूझीलंडनंतर दक्षिण अफ्रिकेकडून व्हाईट वॉश मिळण्याची स्थिती आहे. दक्षिण अफ्रिकेने भारतीय संघाला 123 धावा करू दिल्या नाही. आता पहिला कसोटी सामना गमावल्याने मालिका गमवण्याची भीती सतावत आहे.

IND vs SA : दुसरा कसोटी सामना गमावताच या 4 जणांना बाहेरचा रस्ता? कसं काय ते समजून घ्या
IND vs SA : दुसरा कसोटी सामना गमावताच या 4 जणांना बाहेरचा रस्ता? कसं काय ते समजून घ्या
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 18, 2025 | 9:06 PM

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात दक्षिण अफ्रिकेने भारताला पराभवाचं पाणी पाजलं. विजयासाठी दिलेल्या 123 धावांचं आव्हानही भारताला गाठता आलं नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्यातही घरच्या मैदानावर अशी स्थिती पाहून क्रीडाप्रेमींनी टीकास्त्र सोडलं. कारण भारतीय संघ 123 धावांचा पाठलाग करताना पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. भारतीय संघ फक्त 93 धावा करू शकला आणि 30 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. पहिल्या डावात भारताकडे 30 धावांची आघाडी होती. मात्र दुसर्‍या डावात 30 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. खरं तर घरच्या मैदानावर न्यूझीलंड मालिकेनंतर ग्रहण लागल्याची स्थिती आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी कोचिंग स्टाफवर टीकेची झोड उठवली आहे. आता पुन्हा एकदा गुवाहाटी कसोटी पराभवाची टांगती तलवार आहे.

भारतीय संघाला दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं तर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पहीला रडारवर येईल. कारण त्याच्या निर्णयामुळे टीकेचा धनी ठरेल. त्यानंतर गोलंदाज प्रशिक्षक मोर्ने मोर्केलाही बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. बॅटिंग कोच सितांशु कोटकही रडारवर येणार आहे. तर सहाय्यक प्रशिक्षक रियान टेन डोइशे यालाही बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. म्हणजेच दुसरा कसोटी सामना चार जणांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. पराभव झाला तर सर्वच स्तरातून टीका केली जाईल यात काही शंका नाही. बीसीसीआय देखील या पराभवानंतर तात्काळ निर्णय घेऊ शकते.

भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्धची मालिका 2-0 ने गमावली तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीचं गणित पूर्णपणे विस्कटून जाईल. त्यामुळे भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न दुसऱ्यांदा भंग होऊ शकते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतील भारतात खेळला जाणारा दुसरी कसोटी मालिका आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतात येणार आहे. त्यामुळे आताच स्थिती अशी आहे तर पुढे गणित आणखी कठीण होत जाणार आहे.