IND vs AUS 1st ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडे सामन्यात या खेळाडूंवर असेल नजर, जाणून घ्या पिच रिपोर्ट
IND vs AUS 1st ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला वनडे सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व केएल राहुल करणार आहे. दिग्गज खेळाडूंना आराम दिल्याने दोन्ही संघाच्या सर्वोत्तम खेळाडूंवर नजर असणार आहे.

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी खेळला जाणार आहे. वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीकोनातून ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहालीत होणार आहे. या सामन्यासाठी दिग्गज खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. संघाचं नेतृत्व केएल राहुलकडे असणार आहे. दोन्ही संघ तुल्यबल असल्याने हा सामना अतितटीचा होईल यात शंका नाही. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 146 वनडे सामने झाले आहेत. यात ऑस्ट्रेलियाचं पारडं जड आहे. ऑस्ट्रेलियाने 82, तर टीम इंडियाने 54 सामन्यात विजय मिळवलाआहे. त्यामुळे पहिल्या वनडेत कोणते खेळाडू चमकतील? याबाबत अंदाज बांधले जात आहेत. दुसरं चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वनडे वर्ल्डकप संघात स्थान मिळू शकते. वनडे वर्ल्डकपसाठी खेळाडूंवर शेवटची मोहोर 28 सप्टेंबर लागणार आहे. त्यामुळे खेळाडूंना आपली सर्वोत्तम कामगिरी दाखवावी लागेल.
पिच रिपोर्ट
मोहालीतील पीसीए स्टेडियममधील खेळपट्टी गोलंदाजांसाठी कर्दनकाळ मानली जाते. म्हणजेच या खेळपट्टीवर चौकार आणि षटकारांचा वर्षावर होईल यात शंका नाही. या मैदानात गेल्या चार वर्षात एकही वनडे सामना झालेला नाही. शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 10 मार्च 2019 रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला होता. खेळपट्टीचा अंदाज पाहता नाणेफेकीचा कौल जिंकल्यावर प्रथम फलंदाजीला पसंती दिली जाईल. या मैदानात प्रथम फलंदाजी करताना 320 धावा आरामात होऊ शकतात.तसेच विजय आव्हान गाठण्याची टक्केवारी 40 टक्के आहे.
कोणते खेळाडू ठरतील बेस्ट
ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्क पहिल्या सामन्यात खेळणार नाहीत. त्यामुळे इतर खेळाडूंची निवड बेस्ट ठरेल. यात रवींद्र जडेजाकडून खूप अपेक्षा असतील. डेव्हिड वॉर्नरला सूर गवसला आहे. तर बजेट खेळाडू म्हणून कॅमरून ग्रीन आणि मार्कस स्टोइनिस यांची निवड फायदेशीर ठरेल.
लकी इलेव्हन 1 : केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, मिशेल मार्श (उपकर्णधार), शुबमन गिल (कर्णधार), रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मार्कस स्टोइनिस, कॅमरून ग्रीन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
लकी इलेव्हन 2 : केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, मिशेल मार्श (कर्णधार), शुबमन गिल , रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मार्कस स्टोइनिस, कॅमरून ग्रीन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज (कर्णधार).
पहिल्या दोन वनडेसाठी टीम इंडिया
केएल राहुल (कर्णधार आणि विकेटकीपर), रविंद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड़, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, वाशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
