AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी20 साठी अशी असू शकते भारताची प्लेइंग 11, संघात असा बदल होण्याची शक्यता

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात चार सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात काय होते याची उत्सुकता आतापासूनच लागून आहे. दुसऱ्या टी20 सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव काही बदल करण्याची शक्यता आहे. याबाबत क्रीडातज्ज्ञांनी काही अंदाज बांधले आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी20 साठी अशी असू शकते भारताची प्लेइंग 11, संघात असा बदल होण्याची शक्यता
| Updated on: Nov 09, 2024 | 6:28 PM
Share

भारताने पहिल्या टी20 सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा दारूण पराभव केला. भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 203 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण दक्षिण अफ्रिकेचा संपूर्ण संघ 141 धावांवर आटोपला. भारताने पहिल्याच सामन्यात 61 धावांनी विजय मिळवला आहे. दुसरा टी20 सामना 10 नोव्हेंबरला होणार असून सेंट जॉर्ज ओव्हल मैदानावर होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात टीम इंडियात काही बदल अपेक्षित आहेत. सलामीवीर अभिषेक शर्मा वारंवार फेल गेला आहे. त्यामुळे त्याच्या जागी प्लेइंग 11 मध्ये दुसऱ्या खेळाडूला संधी मिळू शकते. ही जागा भरून काढण्यासाठी भारताकडे रमणदीप सिंग आणि जितेश शर्मा हे दोन पर्या आहे. त्यामुळे या दोघांपेकी एकाला संधी मिळू शकते. संजू सॅमसन सध्या फॉर्मात आहे. सलग दोन शतकानंतर त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. दुसरं त्याच्या ओपनिंगला कोण येते याबाबत उत्सुकता वाढली आहे.

या व्यतिरिक्त संघात इतर काही बदल करणं कठीण आहे. कारण पहिल्या सामन्यात गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. वरुण चक्रवर्ती आणि रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले होते. तसेच अर्शदीप सिंग आणि आवेश खानने चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळे गोलंदाजीत काही बदल होईल असं वाटत नाही.

सेंट जॉर्ज पार्कची खेळपट्टी गोलंदाज आणि फलंदाजांनाही मदत करणारी आहे. सुरुवातीला फलंदाजांना अनुकूल असते पण नंतर गोलंदाजांना मदत करते. खासरून फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर चांगलं यश मिळतं, असं यापूर्वी पाहायला मिळालं आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ येथे प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतात. अक्युवेदरनुसार, सामन्यादरम्यान गडगडाटासह पावसाची फक्त 11% शक्यता आहे. संध्याकाळी दोन-तीन वेळा पावसामुळे खंड पडू शकतो. पावसासह वातावरण ढगाळ असण्याचा अंदाज आहे.

दुसऱ्या टी20 सामन्यासाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, तिलक वर्मा, जितेश शर्मा/रमनदीप सिंग, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, आवेश खान आणि अर्शदीप सिंग.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.