हा भारतीय क्रिकेटर विनोद कांबळीपेक्षाही प्यायचा अधिक दारू; दोन -तीन नाही तर केली तब्बल दहा लग्न
भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामी फलंदाज विनोद कांबळी याला दारूचं प्रचंड व्यसन आहे. त्याच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे तो सध्या चांगलाच चर्चेत आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामी फलंदाज विनोद कांबळी याला दारूचं प्रचंड व्यसन आहे. त्याच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे तो सध्या चांगलाच चर्चेत आहे. तसेच सध्या तो अनेक आजारांचा देखील सामना करत आहे. विनोद कांबळीने दोन लग्न केली. त्यांच्या दोन्ही पत्नींना विनोद कांबळीच्या या सवयीमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला. पहिली पत्नी तर त्याला सोडून गेली. समोर आलेल्या माहितीनुसार एकेकाळी भारताचा स्टार फलंदाज असलेला हा खेळाडू सध्या अनेक समस्यांचा सामना करत आहेत, त्याची परिस्थिती एवढी वाईट झाली आहे, की त्याच्याकडे आपल्या उपचारासाठी देखील पैसे नाहीयेत.
भारताचा स्टार फलंदाज सचिन तेंडूलकर हा विनोद कांबळीचा चांगला मित्र आहे, दोघांचे कोच देखील एकच होते. दोघांनी सोबतच क्रिकेटमध्ये पर्दापण केलं. मात्र त्यानंतर दारूच्या व्यसनामुळे विनोद कांबळीने सर्व काही गमावलं.सचिनने देखील अनेकदा विनोद कांबळीसाठी मदतीचा हात पुढे केला आहे, त्याला आवश्यक असणारी मदत केली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? की भारतीय क्रिकेटमध्ये असा देखील एक खेळाडू होता तो विनोद कांबळीपेक्षा देखील जास्त दारू प्यायचा. आपण आज जाणून घेणार आहोत पटियाला संस्थानाचे राजे महाराजा भूपेंद्र सिंह यांच्याबद्दल.
महाराजा भूपेंद्र सिंह हे पंजाबचे माजी सीएम कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे आजोबा होते. 1891 मध्ये त्यांचा जन्म झाला. मात्र वयाच्या अवघ्या 52 व्या वर्षीच 1938 साली त्यांचा मृत्यू झाला. समोर आलेल्या माहितीनुसार आजारपणामुळे त्यांचा मृत्यू झाला. अति मद्यापानामुळे लिव्हर खराब झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येतो. त्यांच्या क्रिकेट करिअरबाबत बोलायचं झाल्यास त्यांनी 27 फर्स्ट क्लास सामने खेळले. ज्यामध्ये त्यांनी 40 इनिंग्समध्ये 643 धावा बनवल्या. त्यांनी आपल्या करिअरमध्ये दोन विकेट देखील घेतल्या आहेत.पटियाला पॅकची सुरुवात देखील त्यांनीच केली.मीडिया रिपोर्टनुसार त्यांनी आपल्या आयुष्यात दहा लग्न केल्याची माहिती आहे. मात्र अति मद्य सेवनामुळे त्यांना अनेक आजारांचा सामना करावा लागला, त्यातच नंतर त्यांचा मृत्यू झाला.
