भारतीय कसोटी संघातून या तिघांना मिळणार डच्चू? का ते समजून घ्या
भारताने इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी केली असली तरी काही खेळाडू निवड समितीच्या रडारवर आहेत. वारंवार संधी देऊनही अपयशी झाले आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याची कसोटी मालिका नुकतीच पार पडली. ही मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली. खरं तर या मालिकेत भारताला विजयाची संधी होती. पहिल्या कसोटी सामन्यात गोलंदाजांची सुमार कामगिरी आणि गचाळ क्षेत्ररक्षण भोवलं. तर तिसऱ्या कसोटी सामन्यात भरवशाचे फलंदाज फेल गेले. त्यामुळे भारताला तिसऱ्या सामन्यात अवघ्या 22 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या दोन सामन्यात भारताच्या तीन खेळाडूंनी चांगली कामगिरी केली असती तर ही मालिका भारताच्या पारड्यात गेली असती. त्यामुळे या कसोटी सामन्याचं आकलन करून तीन खेळाडूंचं प्रगती पुस्तक समोर आलं आहे. त्यामुळे पुढच्या कसोटी मालिकेपूर्वी या तिघांना आराम दिला जाण्याची दाट शक्यता आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात सुमार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिलं नाव करूण नायरचं आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्याने त्याला कसोटी संघात पुन्हा स्थान दिलं गेलं. आठ वर्षानंतर त्याचं टीम इंडियात पुनर्वसन झालं खरं.. पण त्यात त्याने काही खास केलं नाही. त्याला चार सामन्यातील 8 डावात फलंदाजी करण्याची संधी मिळाली. पण फक्त 205 धावा करू शकला आणि एकच अर्धशतक ठोकलं. इतर फलंदाज खोऱ्याने धावा करत असताना करूण नायर मात्र पूर्णपणे फेल गेला. दुसरं नाव आहे साई सुदर्शनचं… त्यानेही काही खास कामगिरी केली नाही. त्याला तीन सामन्यातील सहा डावात फलंदाजीची संधी मिळाली. पण त्यात त्याने 140 धावा केल्या.
तिसरं नाव आश्चर्यकारक असलं तरी वर्कलोड मॅनेजमेंटमुळे भारतीय संघाता इंग्लंड दौऱ्यात तालमेल बिघडला होता. त्यामुळे भारतीय संघाला वारंवार विचार करावा लागत होता. त्यामुळे त्यालाही पुढच्या मालिकेत आराम दिला जाण्याची शक्यता आहे. मालिकेतील सर्व सामन्यात सक्षम असेल तरच त्याला संघात दिली जाण्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. पुढची कसोटी मालिका वेस्ट इंडिजविरुद्ध असून दोन सामन्यांची मालिका आहे. ही मालिका भारतात असल्याने 2-0 ने जिंकणं भाग आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीचं स्वप्न तेव्हाच पूर्ण होऊ शकते. नाही तर भारतीय संघाला इतर संघांच्या कामगिरीवर लक्ष ठेवून राहावं लागेल.
