SA vs IND 3rd Odi | संजूला साथ देत तिलकचा झंझावात, कारकीर्दीतील पहिलंवहिलं अर्धशतक

Tilak Vamra Maiden Odi Fifty | तिलक वर्मा याने आपल्या एकदिवसीय कारकीर्दीतील पहिलंवहिलं अर्धशतक हे दक्षिण आफ्रिके विरुद्ध झळकावलं आहे. तिलकने या दरम्यान 5 चौकार आणि 1 षटकार लगावला.

SA vs IND 3rd Odi | संजूला साथ देत तिलकचा झंझावात, कारकीर्दीतील पहिलंवहिलं अर्धशतक
| Updated on: Dec 21, 2023 | 8:56 PM

पार्ल | क्रिकेट टीम इंडियाचा युवा ऑलराउंडर तिलक वर्मा याने आपल्या वनडे कारकीर्दीतील पहिलंवहिलं अर्धशतक हे दक्षिण आफ्रिके विरुद्ध ठोकलंय.  पार्लमधील बोलँड पार्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात तिलकने ही अर्धशतकी खेळी केली आहे. तिलक वर्मा याला याआधी दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यात विशेष काही करता आलं नाही. मात्र तिलकने ऐन निर्णायक क्षणी चिवट खेळी करत अर्धशतक पूर्ण केलं.

तिलकने चौकार ठोकत रुबाबात फिफ्टी पूर्ण केली. तिलकने 75 चेंडूत 5 चौकार आणि 1 खणखणीत सिक्सच्या मदतीने हे अर्धशतक पूर्ण केलं. रिंकूने 69.33 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक झळकावलं. तिलकने या दरम्यान संजूला चांगली साथ देत टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणून ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली.

तिलककडून अर्धशतकानंतर आणखी मोठ्या खेळीची आणि फटकेबाजीची अपेक्षा होती. मात्र अर्धशतकानंतर तिलक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आऊट झाला. तिलकला केशव महाराज याने लॉलीपॉप बॉल टाकून फटका मारण्यास प्रवृत्त केलं. तिलक या जाळ्यात फसला. तिलकने बैठक सिक्स मारण्याच्या प्रयत्नात आपली विकेट टाकली.
तिलक 77 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारच्या मदतीने 52 धावा करुन आऊट झाला.

चौथ्या विकेटसाठी निर्णायक भागीदारी

दरम्यान तिलक वर्मा आऊट होताच मोठ्या भागीदारीचाही अंत झाला. तिलकने संजू सॅमसन याला चांगली साथ देत टीम इंडियाकडून चौथ्या विकेटसाठी मोठी भागीदारी केली. संजू आणि तिलक या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळेच टीम इंडियाला 300 धावांच्या आसपास मजल मारता आली.

चौथ्या विकेटसाठी शतक

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), संजू सॅमसन, साई सुदर्शन, रजत पाटीदार, तिलक वर्मा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स आणि ब्यूरन हेंड्रिक्स.