IPL 2023 मध्ये पाहा कोण सिक्सर किंग?, पाचवा व्या स्थानावर टीम इंडियाचं भविष्य!
गुजरात टायटन्स संघ टॉपला असून दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्ज आहे. हे दोन्ही संघ जरी वरती असले तरी या संघामधील खेळाडू ऑरेंज कॅपचे मानकरी नाही.

मुंबई : आयपीएल 2023 च्या पर्वातील काहीच सामने बाकी राहिले आहेत. आतापर्यंतच्या सामन्यानंतर अद्यापही प्ले ऑफच्या चार संघांचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. यामध्ये गुजरात टायटन्स संघ टॉपला असून दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्ज आहे. हे दोन्ही संघ जरी वरती असले तरी या संघामधील खेळाडू ऑरेंज कॅपचे मानकरी झाले नाहीत. इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मध्ये आतापर्यंत एकूण 55 सामने खेळले गेले आहेत. आतापर्यंत लीगमध्ये सर्वाधिक सिक्स पाहा कोणी मारले आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)चा कर्णधार फाफ डू सर्वाधिक षटकारांच्या बाबतीत नंबर 1 वर विराजमान आहे. तर आऱसीबी संघाचाच खेळाडू ग्लेन मॅक्सवेल दुसऱ्या क्रमांकावर आहे. डू प्लेसिसने 32 सिक्सर तर मॅक्सवेलने आतापर्यंत 27 षटकार मारले आहेत. चेन्नई सुपर किंग्जसाठी या मोसमात वेगवान फलंदाजी करणाऱ्या शिवम दुबेनेही मॅक्सवेलची बरोबरी केली आहे. या मोसमात शिवमच्या खात्यात 27 षटकारही जमा आहेत.
चौथ्या स्थानी लखनऊ सुपर जायंट्सचा सलामीवीर काईल मेयर्स असून त्याने 22 षटकार मारले आहेत. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर टीम इंडियाचं भविष्य म्हणून ज्यांच्याकडे आता पाहिलं जात आहे असे खेळाडू आहेत.
या यादीत राजस्थान रॉयल्सची यशस्वी जयस्वाल 21 षटकारांसह पाचव्या क्रमांकावर आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या रिंकू सिंगच्या खात्यात 21 षटकार आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडनेही आतापर्यंत 21 षटकार मारले आहेत. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनच्या खात्यात 19 षटकार आहेत तर केकेआरचा कर्णधार नितीश राणाच्या खात्यात 19 षटकार आहेत.
मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि पंजाब किंग्जचे जितेश शर्मा यांनी 18 षटकार ठोकले आहेत. या यादीत फाफ डू प्लेसिस आघाडीवर असेल, पण शिवम दुबे आणि मॅक्सवेल त्याच्या मागे नाहीत. बुधवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात शिवम दुबेने तीन षटकार ठोकले. जिथे CSK ने 27 धावांनी विजय मिळवला होता.
