AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MLC 2024 : बर्थ डे च्या दिवशी ट्रेंट बोल्टचा धमाका, IPL मध्ये 107 कोटी कमावणारा खेळाडू सुद्धा त्याच्यासमोर हतबल

MLC 2024 : बर्थडे बॉय ट्रेंट बोल्टचीच चर्चा आहे. MLC 2024 मध्ये त्याने IPL मधुन 107 कोटी कमावणाऱ्या खेळाडूची विकेट काढून 35 व्या बर्थडेचा आनंद द्विगुणित केला. अशा प्रकारे मेजर लीग क्रिकेटमध्ये तो आपल्या टीमचा यशस्वी गोलंदाज ठरलाय.

MLC 2024 : बर्थ डे च्या दिवशी  ट्रेंट बोल्टचा धमाका, IPL मध्ये 107 कोटी कमावणारा खेळाडू सुद्धा त्याच्यासमोर हतबल
trent boultImage Credit source: (Photo: Getty Images)
| Updated on: Jul 22, 2024 | 12:11 PM
Share

आज 22 जुलै. न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचा वाढदिवस. ट्रेंट बोल्ट आज 35 वर्षांचा झाला. आज वाढदिवशी ट्रेंट बोल्टच्या क्रिकेटच्या मैदानावर जबरदस्त प्रदर्शन केलं. एका खेळाडूसाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते?. ट्रेंट बोल्टने त्याच्या 35 व्या वाढदिवशी अमेरिकेत आग ओकणारी गोलंदाजी केली. तिथे तो T20 चे सामने खेळतोय. त्याने 4 ओव्हर्सचा एक घातक स्पेल टाकला. त्यामध्ये IPL मधून 107 कोटी कमावणारा खेळाडू सुद्धा हतबल झाला.

मेजर लीग क्रिकेट म्हणजे MLC 2024 मध्ये मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क विरुद्ध लॉस एंजिलिस नाइट रायडर्सने प्रथम फलंदाजी केली. सुनील नरेन आणि जेसन रॉय फलंदाजीसाठी उतरले होते. ही जोडी धोकादायक ठरण्याआधीच बर्थ डे बॉय ट्रेंट बोल्टने आपलं काम करुन टाकलं. त्याने नव्या चेंडूने पहिल्याच ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर सुनील नरेनची विकेट काढली. नरेनने आयपीएलमधून 107 कोटींची कमाई केली आहे. MLC 2024 च्या पीचवर बोल्टची ही 8 वी शिकार आहे.

6 इनिंग नंतर 30 धावाही करु शकलेला नाही

सुनील नरेनने IPL मधुन 107 कोटीपेक्षा अधिक कमाई फक्त एक फ्रेंचायजी कोलकाता नाइट रायडर्सकडून कमावले आहेत. KKR साठी सुनील नरेन दहा वर्षापेक्षा पण अधिक काळासाठी खेळतोय. MLC 2024 मध्ये सुद्धा तो शाहरुख खानची टीम लॉस एंजिलिस नाइट रायडर्सचा भाग आहे. सुनील नरेन इथे सलग 5 सामन्यात अपयशी ठरला. त्यानंतर 6 व्या इनिंगमध्ये तो स्फोटक फलंदाजी करेल, अशी अपेक्षा होती. पण बर्थडे बॉय ट्रेंट बोल्ट समोर नरेनच काही चाललं नाही. MLC 2024 मध्ये 6 इनिंग नंतरही सुनील नरेन 30 धावाही करु शकलेला नाही.

स्वत:च्या नावावर 9 वा विकेट

ट्रेंट बोल्टच सुनील नरेनची विकेट काढून समाधान झालं नाही. त्याने उर्वरित 2 ओव्हरमध्ये कॉर्ने ड्राईचा विकेट काढला. त्याच बरोबर MLC 2024 मध्ये स्वत:च्या नावावर 9 वा विकेट केला. MLC 2024 मध्ये आतापर्यंत 6 सामन्यात 9 विकेट घेऊन ट्रेंट बोल्ट मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कचा यशस्वी गोलंदाज ठरलाय.

भाजपचे मुनगंटीवार विरोधकांचे 'भाऊ'? सत्तेत असूनही सरकारला घरचा आहेर
भाजपचे मुनगंटीवार विरोधकांचे 'भाऊ'? सत्तेत असूनही सरकारला घरचा आहेर.
कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडांची कत्तल, रामटेकडीची झाडं तोडून लपवली?
कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडांची कत्तल, रामटेकडीची झाडं तोडून लपवली?.
काका-पुतण्यानंतर 'पॉवर'फुल्ल बैठक, राष्ट्रवादी पुन्हा एक होणार?
काका-पुतण्यानंतर 'पॉवर'फुल्ल बैठक, राष्ट्रवादी पुन्हा एक होणार?.
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....