
यूएईवर मोठ्या आणि 200 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने विजय मिळवल्यानंतर आता अंडर 19 टीम इंडिया सलग दुसरा सामना जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. दुबईत अंडर 19 आशिया कप स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेतील पाचव्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील दुसरा सामना असणार आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना रविवारी 14 डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना दुबईतील आयसीसी एकेडमी ग्राउंडवर आयोजित करण्यात आला आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 10 वाजता टॉस केला जाणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे लाईव्ह पाहता येईल.
आतापर्यंत अंडर 19 टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 27 सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडिया इथेही पाकिस्तानवर वरचढ राहिली आहे.टीम इंडियाने या 27 पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध 15 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानने भारताचा 11 सामन्यांमध्ये पराभव केला आहे.
दरम्यान टीम इंडिया आणि पाकिस्तानने या स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. पाकिस्ताने मलेशियावर 297 धावांनी मात केली. तर टीम इंडियाने यूएईवर 234 धावांनी धुव्वा उडवला आहे. पाकिस्तान आणि टीम इंडियाचे पॉइंट्स सारखेच आहेत. मात्र पाकिस्तानचा नेट रनरेट जास्त असल्याने ते पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहेत. पाकिस्तानचा नेट रनरेट हा +5.940 असा आहे. तर टीम इंडियाचा नेट रनरेट हा +4.680 इतका आहे. आता टीम इंडियाला पाकिस्ताना खेचायचं असेल तर रविवारी विजय मिळवावा लागणार आहे. हा सामना कोण जिंकतं? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.