AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs PBKS Umran malik IPL 2022: उमरान मलिकची डेंजरस लास्ट ओव्हर, मेडन टाकून चार विकेट, पहा VIDEO

SRH vs PBKS Umran malik IPL 2022: सनरायजर्स हैदराबादच्या (SRH) उमरान मलिकने (Umran Malik) आज भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. त्याने प्रतितास 150 किमीपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी केली.

SRH vs PBKS Umran malik IPL 2022: उमरान मलिकची डेंजरस लास्ट ओव्हर, मेडन टाकून चार विकेट, पहा VIDEO
SRH उमरान मलिकImage Credit source: PTI
| Updated on: Apr 17, 2022 | 7:35 PM
Share

मुंबई: सनरायजर्स हैदराबादच्या (SRH) उमरान मलिकने (Umran Malik) आज भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. त्याने प्रतितास 150 किमीपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी केली. उमरान मलिक मूळचा जम्मू-काश्मीरचा आहे. यंदाच्या सीजनमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीने त्याने अनेक दिग्गजांना प्रभावित केलं आहे. या कामगिरीच्या बळावरच सनरायजर्स हैदराबादने या युवा प्रतिभावान वेगवान गोलंदाजाला रिटेन केलं होतं. मागच्या दोन सामन्यात उमरानने आपल्या प्रदर्शनाने एक्सपर्ट त्याला भारतीय क्रिकेटचं भविष्य का म्हणतायत? ते दाखवून दिलं. आज सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्समध्ये (SRH vs PBKS) आयपीएलचा 28 वा सामना खेळला जातोय. या मॅचमध्ये उमरानने मेडन ओव्हर टाकली. म्हणजे एकही रन्स दिला नाही. उमरानने 20 व्या षटकात मेडन ओव्हर टाकली. आयपीएल स्पर्धेत डेथ ओव्हर्समध्ये मेडन ओव्हर टाकणं, खूप मोठी गोष्ट आहे.

उमरानने मलिकने आज या उलट केलं

अनेक दिग्गज गोलंदाज चेंडू नवीन असताना, निर्धाव षटक टाकतात. सध्या सुरु असलेल्या आयपीएलचा ट्रेंड बघितला, तर 15 ते 20 षटकात गोलंदाजाला कुटलं जातं. खोऱ्याने धावा वसूल केल्या जातात. पहिल्या तीन ओव्हर चांगल्या टाकणाऱ्या बॉलरची सरासरी शेवटच्या षटकात खराब होते. उमरानने मलिकने आज या उलट केलं. त्याने शेवटची ओव्हर मेडन टाकली. महत्त्वाचं म्हणजे त्याने नुसतं निर्धाव षटक टाकलं नाही, तर त्याने चार विकेटही या ओव्हरमध्ये काढल्या.

अशी होती त्याची लास्ट ओव्हर

मलिकने तीन विकेट स्वत: काढल्या. ओडियन स्मिथ, राहुल चहर आणि वैभव अरोरा यांच्या विकेट त्याने काढल्या. शेवटच्या चेंडूवर अर्शदीप रनआऊट झाला. 20 व्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर त्याने ओडियन स्मिथचा आपल्या गोलंदाजीवर झेल घेतला. त्यानंतर त्याने राहुल चाहर आणि वैभव अरोराला क्लीन बोल्ड केलं. त्यांना भोपळाही फोडू दिला नाही. अर्शदीप सिंहने त्याला हॅट्ट्रिक पूर्ण करु दिली नाही. मलिकने पंजाब किंग्सच्या फलंदाजांना खेळपट्टीवर स्थिरावू दिले नाही. उमरान मलिकने आज चार षटकात 28 धावा देत चार विकेट घेतल्या.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.