AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WI vs SL | गेलची देशासाठी PSL मधून माघार, आक्रमक गोलंदाजाचं 9 वर्षानंतर कमबॅक, श्रीलंका विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी विंडिजची घोषणा

श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी वेस्टइंडिज संघाची (West Indies) घोषणा करण्यात आली आहे. संघात ख्रिस गेल (Chris Gayle) आणि फिडेस एडवर्ड्सचे (Fidel Edwards) पुनरागमन झालं आहे.

WI vs SL | गेलची देशासाठी PSL मधून माघार, आक्रमक गोलंदाजाचं 9 वर्षानंतर कमबॅक, श्रीलंका विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी विंडिजची घोषणा
श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी वेस्टइंडिज संघाची (West Indies) घोषणा करण्यात आली आहे. संघात ख्रिस गेल (Chris Gayle) आणि फिडेस एडवर्ड्सचे (Fidel Edwards) पुनरागमन झालं आहे.
| Updated on: Feb 27, 2021 | 10:54 AM
Share

अँटिगा | श्रीलंका वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर (Sri Lanka tour of West Indies 2021 ) येणार आहे. या दौऱ्यात श्रीलंका विंडिज विरुद्ध टी 20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या टी 20 मालिकेसाठी विंडिजने संघाची घोषणा केली आहे. संघात युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचं  (Chris Gayle) 2 वर्षांनंतर पुनरागमन झालं आहे. गेलने या मालिकेसाठी PSL मधून माघार घेतली आहे. तर वेगवान गोलंदाज फिडल एडवर्ड्सने (Fidel Edwards) तब्बल 9 वर्षांनी कमबॅक केलं आहे. तसेच 2 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विंडिज क्रिकेट प्रशासनाने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. (universe boss chris gayle and fidel edwards comeback in west indies t 20i team against sri lanka)

या टी 20 मालिकेत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. हे तिनही सामने अँटिगामधील कुलीज क्रिकेट स्टेडियममध्ये एक दिवसाच्या अंतराने खेळवले जाणार आहेत. 3 ते 7 मार्चदरम्यान या मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.

युनिव्हर्स बॉसचे 2 वर्षानंतर पुनरागमन

ख्रिस गेल पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये खेळत होता. पण देशासाठी त्याने पीएसएलमधून माघार घेत मायदेशात परतणार आहे. या स्पर्धेत गेल क्वेटा ग्लैडिएटर्सकडून खेळत होता. गेलने अखेरचा टी 20 सामना 2019 मध्ये टीम इंडिया विरुद्ध खेळला होता. तेव्हा हा माझा अंतिम सामना असेल, असं गेलने म्हटलं होतं.

9 वर्षांनंतर फिडेलचे कमबॅक

तब्बल 9 वर्षानंतर वेगवान गोलंदाज फिडेल एडवर्ड्सचे विंडिज संघात पुनरागमन होत आहे. फिडेलने अखेरचा सामना 2012 मध्ये खेळला होता. वेगवान गोलंदाजीला आणखी धार मिळवून देण्यासाठी फिडेलला संधी देण्यात आली. मला संघात परतायचंय, अशी इच्छा फिडेलने कर्णधार कायरन पोलर्ड आणि मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स यांच्याकडे बोलून दाखवली होती. फिडेलने विंडिजसाठी एकूण 125 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे.

2 नव्या चेहऱ्यांना संधी

या टी 20 मालिकेसाठी संघात 2 नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. केविन सिनक्लेयर आणि अकील होसेन अशी या खेळाडूंची नावं आहेत. या दोघांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी केली आहे. या जोरावर त्यांना संघात संधी मिळाली आहे. अकीलने बांगलादेश विरुद्ध वनडे सीरिजमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. तसेच ओबेड मेकोनेएलाही संधी मिळाली आहे. याने टी 10 लीगमध्ये प्रतिस्पर्धी संघांना आपल्या खेळीने घाम फोडला होता.

अनुभवी खेळाडूंना संधी नाही

दरम्यान संघात आंद्रे रसेल, शिमरॉन हेटमायर आणि सुनील नारायण या तिकडीला संधी मिळाली नाही. आंद्रे रसेल कोरोनामुळे विश्रांती घेत आहे. तर हेटमायर, रॉस्टन चेज, ओसाने थॉमस आणि कॉट्रेल फिटनेस टेस्टमध्ये नापास झाल्याने त्यांना संधी मिळाली नाही.

श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी विंडिज टीम

कायरन पोलार्ड, निकोलस पूरन, फॅबियन एलेन, ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, फिडेल एडवर्ड्स , आंद्रे फ्लेचर, जेसन होल्डर, अकील होसेन, केविन सिनक्लेयर, एविन लुईस, ओवेबड मॅकोए, लेंडल सिमन्स आणि रोवमॅन पॉवेल.

टी 20 सामन्याचे वेळापत्रक

पहिली टी 20 मॅच, 5 मार्च, अँटिगा

दुसरी टी 20 मॅच, 7 मार्च, अँटिगा

तिसरी टी 20 मॅच, 9 मार्च, अँटिगा

संबंधित बातम्या :

भारताच्या महिला धावपटूचं बालपणीचं स्वप्न पूर्ण, हिमा दास थेट आसाम पोलीस विभागात अधिकारी

Yusuf Pathan | WT20 च्या फायनलमध्ये सेहवागला दुखापत, ऐनवेळी युसूफला संधी, आल्या आल्या षटकार ठोकला, पठाणचा प्रवास

(universe boss chris gayle and fidel edwards comeback in west indies t 20i team against sri lanka)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.