USA vs IND: टीम इंडियाची यूएसए विरुद्ध धारदार बॉलिंग, विजयासाठी 111 धावांचं आव्हान

United States vs Team India 1st Innings: टीम इंडियाच्या गोलंदाजांनी यूएसए विरुद्ध शानदार बॉलिंग केली. त्यामुळे यूएसएला 110 धावांवर रोखण्यात यश आलं.

USA vs IND: टीम इंडियाची यूएसए विरुद्ध धारदार बॉलिंग, विजयासाठी 111 धावांचं आव्हान
Image Credit source: BCCI
| Updated on: Jun 12, 2024 | 10:38 PM

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 25 व्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी धारदार बॉलिंग करत यजमान यूनायटेड स्टेट्सला 110 धावांवर रोखलं आहे. यूएसएला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 110 धावा करता आल्या. आता टीम इंडियाला विजयासाठी 111 धावांचं आव्हान मिळालं आहे. टीम इंडिया आणि यूएसए या दोन्ही संघांचा हा तिसरा सामना आहे. दोन्ही संघांनी याआधीचे 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे हा सामना जिंकून दोन्ही संघांकडे सुपर 8 मध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. त्यामुळे आता ए ग्रुपमधून सुपर 8 मध्ये पोहचणारी पहिली टीम कोण ठरणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

यूएसएकडून नितीश कुमार याने सर्वाधिक 27 धावांची खेळी केली. तर ओपनर स्टीव्हन टेलर याने 24 रन्स केल्या. अँड्रिज गॉस याने 2 धावा केल्या. तर शायन जहांगीर याला भोपळाही फोडता आला नाही.यूएसएच्या फलंदाजांना टीम इंडियाच्या धारदार बॉलिंगसमोर काही खास करता आलं नाही. नियमित कर्णधार मोनांक पटेल याच्या अनुपस्थितीत यूएसएने 100 पार मजल मारण्यात यश मिळवलं. नितीश कुमार आणि स्टीव्हन टेलर या दोघांव्यतिरिक्त यूएसएकडून इतरांना काही खास करता आलं नाही.

यूएसएकडून कॅप्टन अँड्रयू जॉन्स याने 11, कोरी एंडरसन 15, हरमीत सिंग 10 आणि शॅडली व्हॅन शाल्कविक याने नाबाद 11 धावांचं योगदान दिलं. तर जसदीप सिंह 2 धावा करुन आऊट झाला. तर टीम इंडियाकडून अर्शदीप सिंह याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. अर्शदीप टीम इंडियाकडून टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील एका सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करणारा गोलंदाज ठरला. तर उपकर्णधार हार्दिक पंड्या याने 2 विकेट्स घेतल्या. तर अक्षर पटेल याने 1 विकेट घेतली.

टीम इंडियाची धारदार बॉलिंग

युनायटेड स्टेट्स प्लेइंग ईलेव्हन: आरोन जोन्स (कर्णधार), स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रवाळकर आणि अली खान.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.