AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi : फक्त 25 चेंडूत फायर शतक, वैभव सूर्यवंशीचा कारनामा, पाहा व्हीडिओ

Vaibhav Sooryavanshi target in T20l: वैभव सूर्यवंशी याने टी 20 क्रिकेटमध्ये असंख्य विक्रम उद्धवस्त केल्यानंतर पुढील लक्ष्य काय असणार? हे सांगितलं आहे. वैभव काय म्हणाला? जाणून घेऊयात.

Vaibhav Sooryavanshi : फक्त 25 चेंडूत फायर शतक, वैभव सूर्यवंशीचा कारनामा, पाहा व्हीडिओ
Vaibhav Sooryavanshi and Chris GayleImage Credit source: Videograb/Getty
| Updated on: May 25, 2026 | 6:51 PM
Share

राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज आणि वंडर बॉय म्हणून ओळखला जाणारा वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) याने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामातील (IPL 2026) साखळी फेरीत जबरदस्त कामगिरी केली. वैभवने षटकार चौकारांचा पाऊस पाडत खोऱ्याने धावा केल्या. वैभवने यासह राजस्थानला प्लेऑफमध्ये (IPL 2026 Playoffs) पोहचवण्यात प्रमुख भूमिका बजावली. वैभव आयपीएल स्पर्धेच्या एका मोसमात 50 आणि त्यापेक्षा अधिक षटकार लगावणारा पहिला भारतीय फलंदाजही ठरला. वैभवने गेल्या वर्षी 2025 साली राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएल पदार्पण केलं. वैभवने तेव्हापासून आतापर्यंत अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. राजस्थान रॉयल्स आता साखळी फेरीनंतर प्लेऑफसाठी सज्ज झाली आहे.

वैभवने साखळी फेरीत 53 षटकार खेचले आहेत. त्यामुळे वैभवकडे प्लेऑफमध्ये ख्रिस गेल (Chris Gayle) याचा आयपीएल स्पर्धेच्या एका मोसमात सर्वाधिक 59 षटकारांचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. त्यामुळे वैभव गेलचा महारेकॉर्ड मोडीत काढणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

वैभवने इंग्लंडचा माजी विस्फोटक फलंदाज केविन पीटरसन याच्यासोबत एका युट्यूब शो दरम्यान ख्रिस गेल याचा आयपीएलमधील सर्वाधिक 175 धावांचा विक्रम मोडीत काढणार असल्याचं म्हटलं. तसेच वैभवने या दरम्यान द्विशतक झळकावणार असल्याचंही स्पष्ट केलं. वैभवने नक्की काय म्हटलं? हे जाणून घेऊयात. वैभवने केविन पीटरसन याच्या The Switch या युट्यूब चॅनेलवर बोलताना भाष्य केलं. वैभवने या मुलाखतीत बॅटिंग करण्यासह पीटरसनच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.

गेलचा रेकॉर्ड केव्हा ब्रेक करणार?

वैभवने ख्रिस गेल याचा 175 धावांचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासह द्विशतक करणार असल्याचं म्हटलं. वैभवने या दरम्यान द्विशतक करण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच वैभवने द्विशतक कोणत्या सामन्यात करणार हे देखील सांगितलं. मी ज्या सामन्यात संपूर्ण 20 ओव्हर खेळेन तेव्हा गेलचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासह द्विशतक करेन असं वैभवने स्पष्ट केलं.

वैभवचा शतकी तडाखा, पाहा व्ही़डीओ

वैभवचा झंझावात, 25 चेंडूत शतक

दरम्यान केविन पीटरसन याने या खास मुलाखतीत वैभवला 50 चेंडूत शतक करण्याचं आव्हान दिलं होतं. मात्र वैभवने त्यापेक्षा निम्म्या चेंडूत शतक झळकावलं. वैभवने अवघ्या 25 चेंडूत शेकडा पूर्ण केला. त्यामुळे आता वैभव एलिमिनेटर सामन्यात कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राजस्थानसमोर एलिमिनेटरमध्ये सनरायझर्स हैदराबादचं आव्हान असणार आहे.

Follow Us
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या...
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या, व्हिडिओवर नेटकरी फिदा
खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! रोहा उड्डाण पुलावर एकाचा जागीच मृत्यू
Roha Accident | खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! रोहा उड्डाण पुलावर पोलीस पाटलाचा जागीच मृत्यू
महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर?
Maharashtra ATS Raid | महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर? थेट पाकिस्तानशी...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण?; सुप्रिया सुळेंनी उघड केली इनसाईड स्टोरी...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण?; सुप्रिया सुळेंनी उघड केली इनसाईड स्टोरी, म्हणाल्या...
हो... कदरूपणा आहे! राऊतांचं शिंदेंना चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
हो... कदरूपणा आहे! राऊतांचं शिंदेंना चोख प्रत्युत्तर; म्हणाले, बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दरोडा...
रमेश म्हात्रेंच्या भवितव्याचा आज फैसला होणार?; दोन दिवस रुग्णालयात...
Ramesh Mhatre Case | दोन दिवस रुग्णालयात उपचार...आता थेट कोर्टात!; रमेश म्हात्रेंच्या भवितव्याचा आज फैसला होणार?