Bcci : वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रेचा भारतीय संघातून पत्ता कट, बीसीसीआयचा मोठा निर्णय

Vaibhav Sooruyavanshi and Ayush Mhatre : वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे अंडर 19 टीम इंडियाचे स्टार खेळाडू आहेत. मात्र या दोघांना निवड समितीने टीममधून वगळलं आहे. जाणून घ्या

Bcci : वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रेचा भारतीय संघातून पत्ता कट, बीसीसीआयचा मोठा निर्णय
Vaibhav Sooryavanshi and Ayush Mhatre
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 08, 2026 | 12:22 AM

 

आयुष म्हात्रे अंडर 19 टीम इंडियाचा कर्णधार आहे. तसेच वैभव सूर्यवंशी अंडर 19 टीम इंडियाचा प्रमुख फलंदाज आहे. या दोघांनी भारताला काही महिन्यांआधी आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख भूमिका बजावली होती. आयुष आणि वैभव या दोघांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आयुष देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं तर वैभव बिहारचं नेतृत्व करतो. आयुष आणि वैभव या दोघांनी 2025 साली आयपीएल स्पर्धेत पदार्पण केलं. तेव्हापासून दोघांचा झंझावात सुरु आहे. सध्या दोघेही आयपीएलच्या 19 व्या मोसमात खेळत आहेत. वैभव आणि आयुष दोघेही भारतीय संघाचे फ्यूचर स्टार आहेत. मात्र या दोघांबाबत बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.

बीसीसीआयने अंडर 25 टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने या संघात आयुष आणि वैभव या दोघांना संधी दिली नाहीय. आयपीएलच्या 19 व्या मोसमानंतर बंगळुरुतील सेंटर ऑफ एक्सीलेन्समध्ये (COE) स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेतून भविष्यातील स्टार खेळाडूंची निवड केली जाणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा युवा खेळाडूंसाठी टर्निंग पॉइंट ठरणार आहे.

तसेच अंडर 19 आणि अंडर 25 टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. बीसीसीआयने अंडर 25 टीमची घोषणा केली आहे. या संघात निवड समितीने वैभव आणि आयुषला संधी दिली नाहीय. बीसीसीआयच्या या अंडर 25 स्पर्धेबाबत आपण जाणून घेऊयात.

आयपीएल 2026 नंतर अंडर 25 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. एकूण 4 संघात 4 दिवसीय सामने खेळवण्यात येणार आहेत. या खेळाडूंच्या कामगिरीवर सीओई प्रमुखांची करडी नजर असणार आहे. या स्पर्धेत 60 पेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

64 खेळाडूंची निवड कशी केली जाणार?

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय सीओईमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत 64 खेळाडू सहभागी होणार आहेत. या 64 पैकी 25 खेळाडूंची निवड ही सीके नायडू स्पर्धा आणि अंडर 23 वनडे टीममधून केली जाणार आहे. तसेच निवड समिती आणखी 25 खेळाडूंची निवड करेल. तसेच 25 क्रिकेटपटूंची निवड ही रणजी, विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱ्यांमधून केली जाणार आहे. तर आयपीएल स्पर्धेतून 14 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. आयुष आणि वैभव आयपीएलच्या 19 व्या मोसमात खेळत आहेत. त्यामुळे या दोघांचा 14 खेळाडूंचा यादीत समावेश असेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अंडर 25 टीम इंडिया : आयुष दोसेजा, यश धुल , मयंक वर्मा, आयुष पांडे, शाश्वत रावत, महेश पिठिया, राज लिंबांनी, आर्या देसाई, सिद्धार्थ देसाई, आकिब खान, कार्तिक यादव, विद्याधर पाटील, के हिमातेजा, भुवनगिरी पुन्नैया, पुखराज मान, यशवर्धन दलाल, पार्थ वत्स, ईडन एप्पल टॉम, हिमांशु सिंह आणि अमन मोखाडे.

Follow Us