वंदे मातरम् ! टी20 वर्ल्डकपसाठीचा टीझर आला समोर, ऐकताना अंगावर येईल शहारा

आयपीएल स्पर्धा आता रंगतदार वळवणार आली असली तरी सर्वांना वेध लागले आहेत ते टी20 वर्ल्डकपचे...कारण ही स्पर्धा दोन वर्षांतून एकदा येते. त्यामुळे जेतेपदावर नाव कोरण्यासाठी सर्वच संघ सज्ज आहेत. एकूण 20 संघ सहभागी असून जेतेपदावर कोण नाव कोरणार? याची उत्सुकता आहे.

वंदे मातरम् ! टी20 वर्ल्डकपसाठीचा टीझर आला समोर, ऐकताना अंगावर येईल शहारा
Follow us
| Updated on: Apr 23, 2024 | 5:48 PM

आयपीएल स्पर्धा संपली की संपली सर्वांना टी20 वर्ल्डकप स्पर्धेची मेजवानी मिळणार आहे. यंदा पहिल्यांदाच 20 संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. 1 जूनपासून ही स्पर्धा अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये संयुक्तरित्या होणार आहे. जवळपास एक महिना ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याचा शेवटचा दिवस 1 मे आहे. भारतीय संघाची घोषणा 30 एप्रिल किंवा 1 मे रोजी होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया स्पर्धेत उतरणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडशी होणार आहे. त्यानंतर 9 जून रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी लढत होईल. या स्पर्धेची वातावरण निर्मिती आतापासून सुरु झाली आहे. स्टार स्पोर्ट्सने या स्पर्धेसाठीचा एक प्रोमो शेअर केला आहे. वंदे मातरम हे गाणं मैदानातील प्रेक्षकांच्या आवाजासोबत एकत्र केलं आहे. त्यामुळे प्रोमो ऐकताना अंगावर शहारा उभा राहतो.

प्रोमोमध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा दिसत आहे. हा व्हिडीओ चाहत्यांना आवडला असून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. भारताने यंदा वर्ल्डकप जिंकवा अशी भारतीय क्रीडाप्रेमींची अपेक्षा आहे. गेल्या 11 वर्षांपासून आयपीएल चषकांचा दुष्काळ आहे. शेवटचा आयसीसी चॅम्पियनशिप चषक महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वा टीम इंडियाने 2013 मध्ये जिंकला होता. तसेच वनडे वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं.

टी20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा अजूनही झालेली नाही. त्यामुळे या प्रोमोत हार्दिक पांड्याला पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्यामुळे त्याला संघात स्थान मिळणार असं काहींचं म्हणणं आहे. तर काही जणांचा मते आयपीएलमध्ये त्याची कामगिरी हवी तशी नसताना त्याची निवड होणं कठीण आहे. दुसरीकडे, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा यांची निवड जवळपास निश्चित असल्याचं समोर येत आहे. पण बीसीसीआयने कोणला संधी दिली आणि कोणाचा पत्ता कापला हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

भारतीय संघाचं वेळापत्रक

  • 5 जून 2024 : भारत विरुद्ध आयर्लंड, न्यूयॉर्क
  • 9 जून 2024 : भारत विरुद्ध पाकिस्तान, न्यूयॉर्क
  • 12 जून 2024 : भारत विरुद्ध यूएसए, न्यूयॉर्क
  • 15 जून 2024 : भारत विरुद्ध कॅनडा, फ्लोरिडा
Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.